स्वाभिमान दिवस गडचांदूर शहरात धुमधडाक्यात साजरा


लोकदर्शन 👉मोहन भारती
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा 10 मे हा जन्मदिवस स्वाभिमान दिवस म्हणून वंचित बहुजन आघाडी गडचांदूर च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधीही कोणासमोर न झुकता आज पर्यंत स्वाभिमानाने राजकीय लढाई लढत राहिले म्हणूनच त्यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात सुद्धा स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला
त्यांच्या वाढदिवसानिमित्त 40 कट आउट बनवून कोरपना रोडवर वंचित बहुजन आघाडीचा एकेक जाहीरनामा लिहिण्यात आला तसेच संविधान चौकात एक मोठा कट आउट लावण्यात आला.
ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे सकाळी नऊ वाजता बिस्कीट आणि फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच सायंकाळी सहा वाजता संविधान चौक गडचांदूर येथे शरबत वाटपा सोबतच केक कापून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या आनंदात साजरा कर आला या कामासाठी
याप्रसंगी प्रा. डॉ. सोमा गोंडाणे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर तसेच तालुकाध्यक्ष मधुकर चूनारकर साहेब, ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येतील वैद्यकीय अधिकारी डॉ गाडे साहेब तसेच वंचित बहुजन आघाडी चे सर्व कार्यकर्ते दिव्यकुमार बोरकर, प्रा. डॉ. सुखदेवे सर, मायाताई दुर्गे, सरोज बोरकर, आशाताई सोडवले बेबीताई वाघमारे साजिद शेख, शरद बोरकर, अनिल वाघमारे पंकज निरांजने सचिन सोनटक्के, समाधान सोनकांबळे, सुरेश ताडे, संजय घुले, पिंटू रामटेके, विक्की खाडे, बडोले ताई, लालबहादूर वाघमारे, राज्यपाल बोरकर,खिज्जु शेख ,फुलसिंग, सुनिल फुलझेले पंकज निरनजने ,व सर्व कार्यकर्ते तसेच पोलिस प़शासन यांचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here