प्राचार्य शरद जोगी यांचा सेवानिवृत्तीपर निरोप व सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

  • ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    गडचांदूर,,,
    महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथील मुख्याध्यापक/प्राचार्य शरद जोगी हे नियत वयोमानानुसार ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 30 एप्रिल ला सेवा निवृत्त झाले त्यांचा व पत्नी सौ,रेखा जोगी यांचा शाळा समितीचे अध्यक्ष तथा गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे जेष्ठ संचालक विठ्लराव थिपे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विकास भोजेकर होते. याप्रसंगी विठ्ठलराव थिपे यांनी प्राचार्य शरद जोगी यांच्या कार्याची प्रशंसा केली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी,प्रभूदास वासाडे,प्रा साईनाथ.कुंभारे,पद्माकर खैरे,प्रा.विनोद पत्रकार यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाला दत्ता येडमे, रामकृष्ण परसूटकर, सलमाबी कूरेशी , कांचन तामगाडगे,चेतन पडवेकर , वामन सोनपितरे,प्रभाकर काकडे,मधूकर काकडे उपस्थित होते.संचालन पद्माकर खैरे यांनी केले तर आभार विनोद पत्रकार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here