आटपाडी डबई कुरण विषय विशेष लेख! ,जेष्ठ साहित्यीक डॉ. शंकरराव खरात जन्म शताब्दी वर्षा निम्मीत्त, विलास खरात

 

लोकदर्शन आटपाडी ;👉
राहुल खरात

डॉ. शंकरराव खरात यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या प्रसंगाचे कथन करीत आहे.

• आटपाडी येथील तत्कालीन महार समाज्याने सरकारकडे डबई कुरणातील जमीन मिळावी म्हणून स्वात्र॑त्यानंतर रितसर मागणी केलेली होती. पुर्वी औंध संस्थानात काम करीत होते. समाज, मेहनती, कष्टाळू धाडसी व प्रामाणिक असलेमुळे औंधच्या राजांनी डबई कुरणातील जमीन कायमस्वरुपी देणेचे ठरविले होते राजकारभार जनतेच्या हिताच व सोयीचा असलेने अनेक दुरदर्शी व धोरणात्मक निर्णय घेतलेले होते. त्यापैकी डबई कुरणातील जमीन समाज्याला प्रदान करणेचा निर्णय होता.

परंतू औंध संस्थान हे भारतात सन १९४६ सालीच विलिन झालेमुळे जमीनीचे हस्तांतर थांबले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज्यातील जुन्या जानत्या कारभारी मंडळीनी सरकारकडे अर्ज विनंत्या केलेल्या होत्या. जमीनीबाबत समाज्याने फार मोठा संघर्ष उभा केला होता. त्यावर शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन डबई कुरणातील जमीन महार समाज्याला एक वर्षाच्या लागवडी वर देणेत आली होती.

सदर जमीनीवर जंगल असलेमुळे सनदी अधिकारी जमीनीमध्ये जाणेस मनाई केली व जमीनीचा ताबा देण्यास अडथळा निर्माण केला. त्यामुळे पुन्हा संघर्ष निर्माण झाला. तनावाची परिस्थीती झालेमुळे समाज्यातील मंडळी एकत्र आली तक्यामध्ये ( समाज मंदीर) प्रमुख मंडळीनी चर्चा विचार विनीमय करुन समाज्याच्या बैठकी मध्ये निर्णय

केला कि सरकार बरोबर संघर्ष करणेपेक्षा जमीनीबाबत तोडगा काढला पाहिजे त्यावर जुन्या कारभारी मंडळीनी म्हणणे मांडले कि शंकरराव खरात हे पुण्यामध्ये वकिली करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात असतात त्यांना पत्र पाठवून बोलावून घेऊया त्याच बरोबर शेडयुल कास्ट फेडरेशनचे आमदार मा. पी. टी. मधाळे साहेब यांना ही • बोलावून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन मार्ग काढूया याबाबत सर्वाचे एकमत झाले व पत्र व्यवहार करणेचे ठरविले. याबाबत या दोन मान्यवरांना पत्र पाठविणेत आले.

त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव खरात व पी. टी. मधाळे आटपाडीस आले समाज्यातील प्रमुख मंडळीनी दोघांचीही भेट घेऊन डबई कुरणाच्या जमीनीबाबतची तपशिलवार माहिती दिली. संर्घषाचा प्रश्न उभा राहिला आहे. हा समाज्यावर अन्याय आहे. हक्का पासून डावले जात आहे. इत्यादी कथन करुन शासनाचे १ वर्षाचे लागवडीचे पत्र दाखविले व सनदी अधिकारी जमीनीमध्ये जाणेस मनाई करतात. अडथळा निर्माण करतात. त्यामुळे समाज्याच्या भावना त्रीव आहेत. यावर आपण तोडगा काढवा व सदरची बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कानावर घालावी असे सांगितले. त्यावर सर्वाचे म्हणजे ऐकूण यावर लवकरच मार्ग काढूया असे सांगितले व समाज्याच्या भावना समजून घेतल्या.

पुणे मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब आले असताना शंकरराव खरात व पी. टी. मधाळे या दोन मान्यवरांनी भेट घेऊन आटपाडी येथील जमीनी बाबतची समाज्याची भावना व संर्घषाच्या

प्रश्नाबाबत चर्चा करुन यावर उपाय काय? यावर बाबासाहेबांनी सांगितले कि कलेक्टरांना निवेदनामध्ये म्हणा की जमीन आम्हांला १ वर्षाच्या लागवडीखाली मिळालेली आहे. त्या जमिनीवरची झाडे तुमची काढून न्या जमीन आमची आम्हांला मोकळी करुन दया त्याप्रमाणे निवेदन देणेत आले.

त्यानंतर मा. कलेक्टर साहेब यांनी हुकूम काढून कायमस्वरुपी कब्जेपट्टीने जमीन दिली त्यावर नियोजित शेती संस्था काढून चिफ प्रमोटर म्हणून सदाशिव मारुती मोटे यांची निवड सर्वानुमते करणेत आली. अशा हया जेष्ठ साहित्यीक डॉ. शंकरराव खरात व आंबेडकरी चळवळीतील माजी आमदार पी. टी. मधाळे यांना मानाचा मुजरा करतो..

 

आ. विलास खरात, आटपाडी मो.नं. ९२८४०७३२७७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *