.नरेशबाबू पुगलीयाच्या यशस्वी मध्यस्तीने कामगारांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय !

प्रतिनीधी: अशोककुमार  भगत


गडचांदुर:- दि. 25/03/2022
मराठा अंबुजा सिमेंट उप्परवाही येथील कंत्राटी कामगार श्री. भाउराव महादेव डाखोरे व संतोष  हरी पवार हे दोन्ही कामगार गडचांदुर वरून उप्परवाही ला येत असतांना दि. 22/03/2022 रोज मंगळवारला सकाळी 8.55 च्या दरम्यान सना पेट्रोलपंपा जवळ के.टी.सी ट्रॉस्नपोर्ट कंपनी च्या ट्रक कं्र. टी. एस. 01 ओ.सी. 0225 हया वाहनांने दुचाकीने येत असलेल्या दोन्ही कामगारांना धडक दिली. या मध्ये भाउराव मारोती डाखोरे यांचा घटनास्थळी मृत्यु झाला. तर दुसरे संतोष  हरी पवार गंभीर जख्मी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी डॉ.मेहरा चंद्रपुर येथे पाठविण्यात आले.
हया घटनामुळे कामगारांन मध्ये प्रचंड रोश निर्माण झाला. त्यावेळी मा. नरेषबाबु पुगलीया यांच्या नेतृत्वातील कामगार संघटनाने अंबुजा व्यवसस्थापन तथा के.टी.सी हया कंपनी कडे मय्यत झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थीक मोबद्दला तसेच जख्मी कामगारांच्या उपचाराचा संपुर्ण खर्च कंपनी मार्फत करण्यात यावा ही मागणी रेठुन धरली. परंतु व्यवस्थापन व के.टी.सी. मगाणी धुडकावुन लावली. तर काही दलाल प्रवृत्तीच्या लोकांना हाताषी धरून पोलीस प्रषासना सोबत चर्चा घडवुन थातुर-मातुर फक्त एक लाख रूपयाची मृत्काच्या परिवारास मदत देवुन अंत्यविधी करीता केस पाठविण्यात आली. परंतु कामगार तसेच मय्यत कामगारांच्या कुटुंबीयांना ही मदत मान्य नव्हती. कामगार संघटनेने ही मदत मान्य नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानुसार दोन दिवसात दि.24 मार्च 2022 रोजी व्यवस्थापन व के.टी.सी ट्रॉन्सपोर्ट कंपनी वाटाघटी करण्यात तयार झाली. त्यांनी युनियन चे अध्यक्ष माजी खासदार मा.नरेषबाबु यांच्याषी चर्चा करून मय्यत कामगारांच्या परिवारास पाच लाख रूपये देण्याचे मंजुर करण्यात आले. तसा धनादेष युनियनच्या पदाधिक-या कडे सुपुर्त करण्यात आला. या व्यतीरिक्त कामगारांच्या कुटुंबीयाना मिळणारे कायदेषीर लाभ पी.एफ.,ग्रज्युटी, पेंषन इन्षुरेंस, मिळण्यास पात्र राहतील. तसेच कुटुंबीयांना मोटार व्हेकल अॅक्ट नुसार विमा मिळण्यास पात्र राहतील. तसेच जख्मी कामगारांला दोन लाख पन्नास हजार रूपये व जख्मी कामगारांच्या उपचारासाठी लागणारा खर्च कंपनी मार्फत करण्यात येईल असे ठरविण्यात आले. चर्चे मध्ये मा. जि.प. सदस्य षिवचंद्र काळे युनियन चे महासचिव अजय मानवटकर कार्य अध्यक्ष सागर बल्की संघठन सचिव ईक्बाल षेख धर्मराज पारधे पॅकींग विभागातील कामगार प्रतिनीधी रविंद्र रेड्डी बाळु खनके, रवि षाह, अमोल थिपे, षंकर धांडे, सुधाकर लखमापुरे, रवि पेगडपल्लिवार, अजय जवाधे, अंकित जिवताडे तसेच ट्रॉन्सपोर्ट युनियनचे सुरज उपरे आणि सहकारी पॅंकिंग प्लॅन्ट व वेज बोर्ड चे अधिकारी व ठेकेदारी कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला.
तसेच आंदोलनात सहभागी झाल्याबाब कामगारांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवुन देण्यासाठी सहकार्य केल्याबाबत कामगार संघटनेने युनियच्या अध्यक्ष श्री. नरेषबाबु पुगलीया व सर्व कामगारांचे आभार माण्यात आले.
पत्रकार परिशदेला कामगार नेते तथा जि.प. सदस्य षिवचंद्र काळे अंबुजा युनियन चे सरचिटनीस अजय मानवअकर एल.अन.टी युनियन चे सरचिटनीस साईनाथ बुच्चे कार्यअध्यक्ष सागर बल्की माजी सरपंच गुणवंत तलांडे गजानन मठाले, मुर्लीधर बोंडे, वासुदेव बलकी उपस्थीत होते. मृत्काचा मुलाला पाच लाखाचा धानादेष देण्यात आला. तर गंभीर जख्मीच्या विवाहीतेला दोन लाख पन्नास हजार रूपये चा धनादेष पत्र परिशेदेत प्रधान करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *