स्वाभिमानाने जगण्यासाठी बाबासाहेबांच्या संघटना उभारण्यासाठी तन मन धन अर्पण करा.* *-अशोककुमार उमरे.                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
*बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचा स्वसन्मान सत्याग्रह केला होता. आपण सुद्धा चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिना बाबासाहेबांच्या संघटनेसाठी मानापमानाची तमा न बाळगता स्वाभिमानानी जगण्यासाठी बाबासाहेबांच्या संघटना उभारण्यासाठी तन मन धन अर्पण केले पाहिजे.*

*बाबासाहेबांनी भारतातून लोप पावलेल्या बौद्ध धम्म या संघटनेची दीक्षा घेण्याच्या पहिले आणि दीक्षा घेतल्यानंतरही प्रचार आणि प्रसार करीत धम्म जागृतीच्या कार्यासाठी आपले उर्वरित आयुष्य वाहून घेतले होते. बाबासाहेबांच्या अनुयायी, कार्यकर्त्यांनी व प्रचारकांनी सुद्धा मानापमानाची तमा न बाळगता तथाकथित नेते आणि कार्यकर्त्यांच्या नाकर्तेपणा अस्तित्वहीन झालेल्या बाबासाहेबांच्या समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या अधिकृत संघटना उभ्या करण्यासाठी आणि या संघटना संघटनेच्या संविधानानुसार वाटचाल करण्यासाठी आपले तन, मन आणि धनानी आपले आयुष्य खर्ची घातले पाहिजे, हेच बाबासाहेबांच्या वैचारिक वारसदारांचे आद्य कर्तव्य आहे. बाबासाहेबांच्या समता सैनिक दल, दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तिन्ही संघटनेशिवाय आपणाला अन्य पर्याय नाही. या अधिकृत संघटना गावोगावी स्थापन करण्याचे सोडून आपण नानाविध नेत्यांच्या संघटनेच्या मागे लागल्याने आपल्या मत आणि विचारांचे धृविकरण आपल्या दुश्मनापेक्षा आपणच पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या संघटना अर्थात विचारधारा लाचार आणि कमजोर करतांना दिसत आहे. ही परिस्थिती बदलून आपणाला स्वाभिमानाने जगण्यासाठी बाबासाहेबांच्या संघटनेच्या माध्यमातून एकजुट करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी विरूर स्टेशन येथे २० मार्च ला महाड क्रांती दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या दर रविवारी धम्म आपल्या दारी या धम्म जागृती अभियानाच्या कार्यक्रमात मनोगतात व्यक्त केले.*

*सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय भंते कश्यप हे होते. भंतेजीनी आपल्या देसनात म्हणाले की, बाबासाहेबांनी धम्माबाबतची पूजापाठ, दीक्षा, आचार- विचार, बुद्ध विहाराची निर्मिती, हरेक धार्मिक क्षेत्रातील कार्यक्रम घेण्याची ही संपूर्ण प्रक्रिया “दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या मातृसंघटनेला दिली असल्याने आपण प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हे भारतीय बौध्द महासभा अर्थात दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या माध्यमातून घेतले पाहिजे. असे सांगून बौद्ध धम्माचे दृढता पुर्वक पालन करण्यासाठी बावीस प्रतिज्ञेचे पालन अत्यंत आवश्यक आहे हे कथन करून उपस्थितांना बावीस प्रतिज्ञा देण्यात आल्या. आपल्या समाजातील जुन्या रूढी परंपरेला सोडण्यासाठी बारसे, नामकरण, वाढदिवसाच्या कार्यक्रमासारखे धम्मदीक्षा विधींचे कार्यक्रम घरोघरी आयोजित करणे, घडवून आणणे गरजेचे आहे, यांवर भर दिला.*

*कार्यक्रमांचे प्रास्ताविकात महाड क्रांती दिनाच्या सर्व उपस्थितांना मंगलमय सदिच्छा देऊन सचिन पिपरे यांनी बुद्ध पूजापाठ करतांना अंधश्रद्धा व भेसळ येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच येणाऱ्या जनगणनेत धर्माच्या रकान्यात बौद्धा आणि जातीच्या रकान्यात जाती नाही किंवा जातीच्या रकान्यात निरंक असे लिहिण्याचे तसेच बौद्ध म्हणून जनगणना करण्यासाठी गावोगावी आपल्या समाजातील सुशिक्षित जवान तरूणांनी जनगणना देखरेख मंडळ तयार करून आपली बौद्ध म्हणून जनगणना करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, आवाहन करण्यात आले.*

*सदर कार्यक्रमांत आयआयटी मध्ये विरुर स्टेशन येथून पहिला आलेला आणि आयआयटी वाराणसी, उत्तरप्रदेश येथे शिकत असलेला अंकित रविंद्र पिपरे आणि एमबीबीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश घेणारा स्पंदन शाहू नारनवरे यांचा आदरणीय भंते कश्यप यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’हा धम्म ग्रंथ भेट देऊन आणि मंगल कामना करुन सत्कार करण्यात आला. तसेच पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा आयु. सुप्रिया ताकसांडे यांचा बाबासाहेबांच्या संघटनेचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी बुद्ध पूजापाठ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.*

*संचालन सचिन पिपरे यांनी व आभारप्रदर्शन प्रविण ताकसांडे यांनी केले.*

*याप्रसंगी सचिन पिपरे, प्रविण ताकसांडे, रविंद्र चांदेकर, शाहू नारनवरे, मनोहर वानखेडे, मंजुषा दहागांवकर, गयाबाई खोब्रागडे, ज्योती खोब्रागडे, शोभा देठे, नर्मदा नारनवरे, वंदना झाडे, पुष्पा नारनवरे, उमा धोंगडे, प्रिया झाडे, आम्रपाली उपरे, पोर्णिमा पिपरे, निर्मला झाडे, योगिता उपरे, विद्या उपरे, गयाबाई दुर्गे, सिमा झाडे, सुमन नारनवरे, इंदु चहारे, रेखा वानखेडे, गिता झाडे, शितल देठे, मयुरी वानखेडे, प्रिया तेलसे, सुमलता देठे, आशा चांदेकर, सुरेखा चहारे, सुप्रिया ताकसांडे, पुष्पाबाई ताकसांडे, रतनमाला उपरे, शेवंताबाई दुर्गे, शेवंताबाई उपरे, सखुबाई उपरे, विशाखा झाडे, रमा ताकसांडे, बहिणा उपरे, पारुबाई उपरे, लिलाबाई नगराळे, लक्ष्मीबाई झाडे, शालिनाताई उपरे, कमलाबाई दुर्गे, शिल्पा झाडे, किरण उपरे, इत्यादी कार्यक्रमास उपस्थित होते.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *