कुणाल राऊत यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत सर्वाधिक मते

By 👉 Shankar Tsds

*⭕आतिषबाजी आणि मिठाईचे वाटप करून राज्यभर आनंद साजरा*

नागपुर, ७ मार्च :- युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा आज निकाल जाहिर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाकरिता कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत.
प्रदेशाध्यक्ष पदाकरिता एकूण १४ उमेदवार रिंगणात होते. १२ नोव्हेंबर २०२१ ते १२ डिसेंबर २०२१ दरम्यान राज्यभर सदस्यता अभियान राबविण्यात आले. सदस्य नोंदणी झाल्यावर प्रत्येक मतदाराने ऑनलाइनरीत्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहर अध्यक्ष व विधानसभा अध्यक्ष असे चार मत दिले.
आज जाहिर झालेल्या निकाला दरम्यान कुणाल राऊत यांना सर्वाधिक ५,४८,२६७ मते मिळाली आहेत. राऊत यांनी अनेक दिग्गज उमेदवारांना मागे टाकले आहे. शिवराज मोरे यांना 3,80,367, मते शरण पाटील यांना 2,46,695 मते मिळाली आहेत. सुमारे 1,67,900 मताधिक्क्यांनी कुणाल राऊत विजयी झाले आहेत.

भारतीय युवक काँग्रेसच्या संकेतस्थळावर आज सायंकाळी 5 वा निकाल जाहीर होताच नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करून सर्वत्र आनंद साजरा केला.
या विजयाबद्दल कुणाल राऊत यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते श्रीमती सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रियंका गांधी तसेच युवक काँग्रेसचे कृष्णा अल्लवरू, बी.व्ही. श्रीनिवासन, हरपाल चुडासमा,‍ विजयसिंग राजू, सत्यजित तांबे तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व सन्माननीय मंत्री खासदार, आमदार आणि युवक कांग्रेसच्या आजी माजी नेत्यांचे,‍ पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *