कळमना येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.

.
लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज खरी गरज आहे. त्यांच्या विचारामधुन समाजाची प्रगती व उन्नती होण्यासाठी अनेक प्रेरणादायी संदेश आपल्याला मिळत राहील. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या विचाराचा वसा घेतला पाहिजे अशी अपेक्षा कळमनाचे सरपंच, काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी व्यक्त केली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धानकुटे सर, पेदोर सर, दिनेश आसवले, उमाटे, ताजने यासह विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here