

लोकदर्शन 👉 मोहन भारती
*सोलापूर दिनांक :- २९/०१/२०२२ :-* सोलापूरात सुरु झालेल्या शासनमान्य ताडी(शिंदी) दुकाने हटविण्यासाठी न भुतो न भविष्यती असे तिव्र आंदोलन करणार अशी घोषणा शासनमान्य ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी संघर्ष समितीच्या बैठकीत बोलताना केली. सोलापूरात शासनमान्य ताडी (शिंदी) दुकानांना सर्व स्थरातून विरोध होत असताना देखील जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत शासनमान्य ताडी दुकाने चालु करण्याचे परवाने दिली आहे. म्हणुन शासनमान्य ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकित बोलताना विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी ताडी (शिंदी) दुकाने हटविण्यासाठी ना भुतो ना भविष्य असे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला.
शासनमान्य ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी सायं 5 वाजता कामगार सेना कार्यालयात बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकित सोहेल शेख, गणेश बोड्डू, अशोक इंदापूरे, आनंद बिरू, दत्ता पाटील( सर), व्यंकटेश पडाल(सर) दशरथ नंदाल, लक्ष्मणनारायण दासरी विठ्ठल कुत्हाडकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला सोहेल शेख यांनी प्रास्ताविकात उपस्थित सर्वांना ताडी (शिंदी) दुकाने बंद करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत सुचना करावी असे आव्हान केले.
त्यावरून *आनंद बिरू :-* यांनी या ताडी (शिंदी) दुकानात नैसर्गिक ताडी विकणे अशक्य आहे. त्यामूळे गोर गरीब लोकांचे जीव जातात. म्हणून ताडी (शिंदी) विरोधात संघर्ष समितीने घेतलेल्या आंदोलनास पूर्ण पाठिंबा जाहिर केला.
*व्यंकटेश पडाल (सर) :-* यांनी आम्ही अशोक चौकातील ताडी (शिंदी) दुकानांना विरोध केल्याने ताडी (शिंदी) परवानदारक व त्याचे हस्तक आम्हाला दमदाटी व खोटे गुन्हे दाखल करण्याचे धमकी देत आहेत. म्हणून याबाबत संघर्ष समितीच्या वतीने आवाज उठवावा असे म्हणाले,
*दत्ता पाटील (सर) :-* यांनी ताडी(शिंदी) दुकांने केवळ गोर गरीब कष्टकरी कामगारांना जिवे मारण्यासाठी सुरु करत आहे. म्हणून या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचे गरज आहे. त्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे म्हणाले,
*लक्ष्मीनारायण दासरी :-* यांनी कोर्टात दावा दाखल करावा असे म्हणाले,
*सुशिल उपलभ :-* यांनी मोदीतील शिंदी दुकानांजवळच मंदीर व केंद्रीय शाळा असताना परवानगी कसे दिला असे म्हणाले.
*गणेश बोड्डू :-* यांनी केवळ महसुलासाठी हे दुकान चालू करत असल्याची प्रशासनाकडून सांगितले जाते. पण अधिकाऱ्यांनी आपले खिशे भरण्यासाठी आपले दुकान उघडले आहे. यांना कायद्यानेच संघर्ष केला पाहिजे असे म्हणाले,
*अशोक इंदापूरे :-* यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, या ताडी विरोधी आंदोलनात नगरसेवक, आमदार, खासदार, यांना आपण नाव विचारावे तसेच वेळ पडल्यास मतदानावर बहिष्कार टाकावा आणि न्यायालयीन लढा लडावे असे मार्गदर्शन केले.
*शेवटी विष्णु कारमपुरी (महाराज) :-* यांनी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शासनमान्य ताडी दुकाने परवाना देताना प्रशासनाकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. आणि यात महसूल पेक्षा अधिकारी मलई जास्त घेतलेले स्पष्ट होते गेल्या दोन महिन्यापासून ताडी (शिंदी) विरोधी संघर्ष समितीच्या वतीने २८८ आमदारांना मा. पाणीपूरवठा मंत्री मा. कामगार मंत्री, मा. जिल्हाधिकारी प्रमाणे मा. उत्पादन शुल्क अधिक्षक यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आले. तर ७ जानेवारी रोज मा. पालकमंत्री यांनाही निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री महोदयांनी लगेच ताडी दुकानांना स्थगितीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तरीही जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क अधिकारी दुकाने चालू केले आहे. म्हणून ताडी विरोधी संघर्ष समिती विरोधी वतीनी घेण्यात येणऱ्या ना भुतो ना भविष्यती या आंदोलनास सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान केले.
शेवटी विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी आभार मानुनं बैठक संपले असे जाहिर केले सदर बैठकीस प्रसाद जगताप, समीम शेख, साईराम बिरु, महेश बनसोडे, संजय शिंदे, रोहित वंगारी, शोभा पोला यांच्या सह मोठ्या संख्येने नागरीक बंधु भगिनी मोठया संख्येत उपस्थित होते.