गडचांदूर येथे साडेपाच वर्षीय बालिका वर अल्पवयीन मुलाने केला लैगिक अत्याचार मुलाला अटक

By : Mohan Bharti

गडचांदूर : गडचांदूर येथे शास्त्रीनगर वॉर्डातील साडेपाच वर्षीय बालिकेवर 17 वर्षीय मुलाने लैगिक अत्याचार केल्याची घटना 13 जानेवारी ला रात्री 8,30 च्या दरम्यान मुलीच्या घरी घडली. मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. घटनेच्या वेळी मुलीचे आई वडील घरी नव्हते, मुलगी घरी एकटीच होती याची संधी साधून आरोपी ने मुलीवर अत्याचार केला, सदर प्रकार पीडितेच्या आई च्या लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल केली,आरोपी मुलाचे पीडितेच्या घरी येणे जाणे होते,असे कळते, पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपी अल्पवयीन मुलाला अटक करुन त्याच्या विरोधात भादवी कलम 376(AB),376(2)(N)सह कलम 4,6 ऍक्ट पोक्सो अंतर्गत कारवाई केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा खोब्रागडे तपास करीत आहेत.सध्या सर्वत्र अल्पवयीन मुलीवर, महिला वर,लैंगिक अत्याचार च्या घटना घडत आहे, तेव्हा पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे, मुलींना घरी एकटेच सोडून जाऊ नये,मुलींच्या हालचाली वर बारीक लक्ष ठेवावे, रात्री उशिरापर्यंत मुलीला बाहेर राहू देऊ नये,मोबाइल चा वापर कमीत कमी करण्यास सांगणे,या सर्व बाबीकडे पालकांनी लक्ष दिले तर मुली निश्चितच सुरक्षित राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here