माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते अनिरुद्ध डाखरे यांचा सत्कार

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

राजुरा येथील श्री.डाखरे सर यांचे चिरंजीव कुमार अनिरुद्ध डाखरे हे नीट परीक्षेत 720 पैकी 710 गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड,संजय भाऊ धोटे यांच्या हस्ते अनिरुद्ध डाखरे व त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला,यावेळी डाखरे सरांचे तीन्हही मुले एम.बी.बी.एस.झाले असून त्यांनी तालुक्याचे नाही तर जिल्ह्याचे नाव लैकीक केले,त्यांच्या पुढील वाटलचालीकरिता मा.आमदार अँड संजय धोटे यांनी याप्रसंगी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे कार्यध्यक्ष श्री.अविनाश जाधव,शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.वरकड सर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.सतीश धोटे,खैराणी सर,भाजपचे तालुका महामंत्री श्री.दिलीप वांढरे,श्री.संदिप गायकवाड तथा आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here