युवक काँग्रेसच्या आंदोलनाला यश : जीएनआर कंपनी कामगारांना दिवाळी बोनस देण्यास तयार.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– कामगारांना दिवाळी बोनस देण्यात यावा या मागणीसाठी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेंडे आणि शहराध्यक्ष अशोक राव यांच्या नेतृत्वाखाली जीएनआर कंपनी साखरी येथे काम बंद आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे मान्य केले आहे. तेव्हाच हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
या प्रसंगी शेहबाज शेख, शैलेश गावंडे, सदानंद परचाके, रितेश दुर्गे, संतोष गोडसेेलवार, प्रकाश उईके, निलेश काटवले, सुधीर करमनकर, सुभाष जुनघरे, सुरेंद्र कवलकर, अमोल लोणारे, दिपक उरकुडे, फिरोज शेख, मेघराज लांजेवार, सुनील खुजे, मंगेश मिलमिले, प्रकाश झुंगरे, मोतीराम झुंगरे, सागर खुजे, अमोल अडबाले, सागर जेरपोत, शालिक मालेकर, गंगाधर धवने, प्रदीप गावंडे, प्रशांत गावंडे, गणेश मांडवकर, दिलीप काटवले, विलास चुदरी, राहुल उरकुडे, अरुण येमुलवार, किशोर कोवे, मोहिन खान, अंजना तांदुलवार यासह मोठ्या संख्येने कामगार व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *