

लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :-
कोरपना तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे झाली यात अनेक रस्त्याची दुरावस्था झाली व अनेक नाल्यावरील पुल क्षतीग्रस्त झाल्याने येरगव्हान – परसोडा जि.प.क्षेञातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तात्काळ याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी येरगव्हान – परसोडा क्षेत्राचे जि. प. सदस्या सौ कल्पनाताई उत्तमराव पेचे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष जि. प.बांधकाम सभापती जि. प. यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तालुक्यात 21-22 जुलै या दरम्यान अतिवृष्टी झाली यात जिल्हा परिषद शाळा वडगाव जवळील पुलावर, खैरगाव ते चन्नई (बु) ला जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावरील पुलावर तर पिपर्डा ते चिंचोली रस्त्यावरील नाल्यावरील पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यावर ही खड्डे पडल्याने शेतकऱ्यांना शेतात अवागमन करण्यासाठी नाहक ञास सहन करावा लागत आहे.पुलावरील खड्डे व ग्रामीण भागातील रस्ते तात्काळ दुरुस्ती करून मिळण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर,अध्यक्ष जि. प. चंद्रपूर राजु गायकवाड सभापती बांधकाम तथा वित्त समिती जिल्हा परिषद चंद्रपुर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन पुलावरील खड्डे व रस्त्यावरील खड्डयांची दुरुस्ती करुन जनतेचा होणारा ञास कमी करतील अशी आशा सौ कल्पनाताई उत्तमराव पेचे यांनी केली आहे.