17 व 18 ऑगस्ट ला गडचांदूर येथे महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,
महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय,गडचांदूर येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद
गडचांदुर येथील महात्मा गांधी का्लेज आफ सायन्स या महाविद्यालयात दि.17 व 18 आगस्ट 2021 ला आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली. आहेत, आनलाईन पद्धतीने चालणाऱ्या या परिषदेचा विषय आहे Innovative Trends in Natural and Applied Sciences. या परिषदेचे मुख्य संयोजक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रा. रामकृष्ण वाय. पटले,आहेत, संयोजक डॉ. उत्कर्ष मुन, संघटन सचिव प्रा. चेतन वानखेडे व प्रा.चेतन वैद्य, कमिटी सदस्य प्रा. मनोहर बांदरे, प्रा. पवन चटारे, प्रा. डॉ. संदिप घोडिले,डॉ.अनिस खान, डॉ. अजयकुमार शर्मा हे सर्व प्राध्यापक गेल्या एक महिण्यापासून परिषदेच्या यशस्वीतेकरिता मेहनत घेत आहे. चार सत्रात चालणाऱ्या परिषदेत प्रोफेसर अदिन्पुन्य मित्रा (IIT Kharagpur डॉ. गुनवंत मुळे,रिसर्च सायंटिस्ट,(Virginia University, USA)., डॉ. विरेश ठमके (Orebro University, Sweden,) व डॉ. गजानन मुळे,संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहे. परिषदे करीता संस्थेचे प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष,माजी आमदार ऍड,विठ्ठलरावजी धोटे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष . आमदार सुभाष भाऊ धोटे, मुख्य अतिथी मा. डॉ. श्रीनिवास वरखेडी, प्रभारी कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, मा. धनंजय गोरे,सचिव ग.शि.प्र.मंडळ गडचांदुर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार असून परिषदेला संबोधित करणार आहेत.
आदिवासी भागातील ग्रामीण क्षेत्रात सर्वांना विज्ञानाचे महत्व कळावे,विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाच्या अभ्यासाची गोडी वाटावी,संशोधनाची रूची निर्माण व्हावी व हे संशोधन सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून या परिषदेचे आयोजन केलेले आहे. विज्ञानातील विविध द्रुष्टीकोन, नवीन संकल्पना, सध्याची परिस्थिती व ट्रेंड जाणून घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेच्या माध्यमातून विज्ञान विषयातील सर्व प्राध्यापकांना विनंती करण्यात येते कि त्यांनी आपले संशोधन पर लेख (Research Article) icitnas2022@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. आपले लेख Journal of Advanced Scientific Research या UGC Care listed Journal मध्ये छापण्यात येईल.तरी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, वैज्ञानिक यांना या परिषदेकरिता आनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *