इस्पात प्रकल्पग्रस्ताना योग्य मोबदला द्या : हंसराजजी अहिर

0
273


यवतमाळ :
झरी तालुक्यातील *#मुकुटबन, रुईकोट, भेंडाळा, अर्धवन* या गावातील *#”इस्पात”* कंपनीच्या *प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या* न्याय हक्कासाठी *मा. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर व आ. संजीवरेड्डी बोदकुरवारजी* यांच्या प्रमुख उपस्थितीत दि २९ जुलै रोजी मुकुटबन येथे बैठक पार पडली . या बैठकीत *शेतजमिनीला योग्य भाव मिळावा, शेतीचा त्वरीत मोबदला द्यावा, संपूर्ण* *जमिनीची खरेदी करावी तसेच रुईकोट या गावाचे योग्य स्थळी पुनर्वसन व्हावे* आदि बाबींवर यावेळी चर्चा झाली. याप्रसंगी भाजपा नेते दिनकरराव पावडे, विजय पिदूरकर, रवी बेलुरकर भाजप पदाधिकारी किशोर बावणे, सतीश नाकले, सुरेश मानकर, बोलेनवारताई, लता आत्राम, लक्ष्मी बच्चेवार, बाळू बरशेट्टीवार, धर्माजी आत्राम, बंडू वराडे यांचेसह प्रकल्पग्रस्त बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here