बिबी येथे मोफत मोतीबिंदू डोळे तपासणी शिबीर संपन्न

0
102

 लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,⭕,३१ लाभार्थ्यांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड
⭕,,,,माजी उपसरपंच आशिष देरकर यांचा पुढाकार
गडचांदूर,,
– लायन्स आय सेंटर सेवाग्राम वर्धा, लायन्स क्लब चंद्रपूर महाकाली, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर व कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर पार पडले.
बिबी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आशिष देरकर यांच्या पुढाकाराने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ३१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून सेवाग्राम येथे शस्त्रक्रियेसाठी त्यांना पाठवण्यात आले आहे. सेवाग्राम येथे सर्व लाभार्थ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शिबिरासाठी महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्रातर्फे वीर नर्पतचंद भंडारी, केंद्र अध्यक्ष वीर हरीश मुथा, मनिष खटोड़, सेवाग्राम कॉलेज वर्धा तर्फे डॉ. कर्डिकर, डॉ. गौरव, डॉ. अलिश, बिबी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव बापूजी पिंपळकर, आनंदराव पावडे, नामदेव ढवस, श्रावण चौके, विठ्ठल देरकर आदींनी सहकार्य केले.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here