

By : Shankar Tadas
चंद्रपूर :
राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणाची तरतूद असलेल्या कायद्याची अंमलबजावणी मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे़ या भावनेने माझ्या सोबतच उमरेड तालुक्यातील राजुलवाडी,तिखाडी,चांपा समशेर नगर,दहेगाव येथील पारधी बेड्यावरील शाळाबाह्य मुलाना एकात्मिक आदिवासी प्रकल्प शासनाने वयानुसार प्रवेश देण्याचा निर्णय घेतला .
जन्म तारखेचा दाखला नसलेल्या सर्व शाळा बाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यात आले.
घरची बिकट परिस्थिती, लहानांना सांभाळण्याची जबाबदारी, पालकांची शिक्षणाबाबतची अनास्था, मातृभाषेतील अडचण, पालकांमधील वाद, अशा विविध कारणांमुळे पारधी समाजातील मुले शिक्षणांपासून वंचित राहू नयेत म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे.
या मुलांना शाळेत दाखल केल्यास शिकून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. यासाठी शाळेत नेऊ सर्वांना या मोहिमेत सहभागी असलेले चांपा ग्रामपंचायतीचे सरपंच अतिश पवार,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. एच. माटे,, गुरुकुल आदिवासी आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्यध्यापक व्ही वी पांडे,माध्यमिक आश्रम शाळेचे व्ही आर वासणकर, शिक्षक पी व्ही झाडे, डी. एस. बागडे, एस आत्राम,चांप्याचे सकाळचे बातमीदार अनिल पवार यांच्या उपस्थितीत १६ शाळाबाह्य बालकांना गुरुकुल आदिवासी आश्रमशाळेत शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे ऑन दि स्पॉट ऍडमिशन करण्यात आले आहेत.