शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची शंभरी, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शुभेच्छा, राज ठाकरे भेटीला

0
71

By : Mohan Bharti

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करुन शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. या निमित्ताने पुण्यातील ज्या सोसायटीत बाबासाहेब सध्या राहतायत तिथे अभीष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आहेत.

बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भेट घेण्यासाठी पोहचणार आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे इतर नेतेही पोहचणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here