विदर्भ महाविद्यालयात एक दिवसीय NAAC ओरिएंटेशन कार्यक्रम संपन्न.

By Lokdarshan

विदर्भ महाविद्यालय जिवती येथील इंटर्नल क्वालिटी अशुरंस सेल च्या वतीने नॅशनल असेसमेंट अंड अक्रेडीटेशन कौन्सिल वर एकदिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. युजीसीच्या गाईडलाईन नुसार प्रत्येक महाविद्यालयाला अक्रेडीटेशन करणे अनिवार्य आहेत त्या अनुषंगाने महाविद्यालयाच्या इंटरनल कॉलिटी अशूरांस सेलच्या वतीने एक दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर ओरिएंटेशन कार्यक्रमाकरिता मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. अंचीत नरवडकर सीईओ रूब्रिक्स सॉफ्टकाम प्रा. लिमिटेड पुणे, तसेच मा. प्रतीक शर्मा सह सीईओ रुब्रिक पुणे, आणि राजेंद्र माणिकपुरे ॲडव्हायझर यातीनही एक्स्पर्ट नी महाविद्यालयात येऊन नेक च्या संदर्भात विस्तृत विवेचन केलेत, आवश्यक असणाऱ्या क्रायटेरीया बद्दल बारकाईने समजवून सांगितले. तसेच प्रत्येकाच्या मनात असणारी नेक बद्दल ची धास्ती कमी करण्याचा प्रयत्न केला. आपण कसे सोप्या मार्गाने महाविद्यालयाचे नेक करू शकतो , कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा या संदर्भात बरेचशी मोलाची माहिती दिली. सोबत आपण आपला दर्जा कश्या पद्धतीने उंचाऊ शकतो , हे सुद्धा त्यांनी त्यांच्या अनुभवाने विशद केले. सदर कार्यक्रम आयोजन करण्याकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस. एच. शाक्य यांच्या अथक परिश्रमांनी ही मौलिक संधी इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली. महाविद्यालयाचे आयक्यूएशी हेड प्रा.देशमुख सर यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेऊन उत्तम आयोजन केले. सदर कार्यक्रम करिता व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *