मन की बात कार्यक्रमाने देशाच्‍या ख-या प्रतिभेची ओळख – आ. सुधीर मुनगंटीवार

  1. लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
    ○मन की बातच्‍या ७८ व्‍या कार्यक्रमात आ. मुनगंटीवारांची उपस्थिती.

देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे विविध विषयांवर देशातील जनतेशी हितगुज करतात. या कार्यक्रमाच्‍या ७८ व्‍या भागाचे प्रक्षेपण आज करण्‍यात आले. देशातील कोटयावधी लोकांनी हा कार्यक्रम ऐकला. चंद्रपूर शहरात ५ ठिकाणी हा कार्यक्रम सार्वजनिकरित्‍या साजरा करण्‍यात आला. यातील गांधी चौकात झालेल्‍या कार्यक्रमाला लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री तथा आ. सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

मा. पंतप्रधानांनी आजच्‍या कार्यक्रमात विविध विषयांना स्‍पर्श केला. कोरोना पासून वाचण्‍यासाठी लसीकरण अभियान खुप जोमाने राबवावे असे आवाहन त्‍यांनी देशवासीयांना केले. यासंदर्भात मध्‍यप्रदेशातील एका छोटया गावातील नागरिकांशी संवाद साधत लसीकरणासंदर्भातील त्‍यांचे असलेले गैरसमज दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला. याशिवाय उत्‍तराखंडमधील पाणी वाचविणा-या पाणी दूताची माहिती, उत्‍तरप्रदेशातील एका गावात खेत का पानी खेत में और गाव का पानी गाव में ही योजना राबविण्‍याची माहिती, श्रीनगर मधील एका व्‍यक्‍तीने आपल्‍या बोटीवर अॅम्‍ब्‍युलन्‍स तयार करून लोकजागरणाचे काम सुरू करण्‍याची माहिती, मध्‍यप्रदेशातील एका छोटया गावातील शेतक-याने निरनिराळया बि-बियाण्‍यांना जपून ठेवले असल्‍याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली. २१ व्‍या शतकात जन्‍मलेले युवक १९ व २० व्‍या शतकाची माहिती सांगतात तेव्‍हा त्‍यांचे कौतुक वाटते असेही मा. मोदीजी म्‍हणाले.

१९६४ च्‍या टोकियो ऑलिंम्‍पीक्‍स मध्‍ये भाग घेतलेले प्रसिध्‍द क्रिडापटू मिल्‍खा सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्‍यांच्‍याबद्दल गौरवोद्गार काढत मोदीजींनी त्‍यांना श्रध्‍दांजली वाहीली व येणा-या टोकियो ऑलिंम्‍पीक्‍स मध्‍ये भाग घेणा-या खेळाडूंची माहिती देत त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. १ जुलै हा डॉ. बी. सी. रॉय यांचा जन्‍म जयंती दिवस आहे व नॅशनल डॉक्‍टर्स डे आहे. यानिमीत्‍ताने देशातील सर्व डॉक्‍टरांना शुभेच्‍छा देण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. तसेच त्‍या दिवशी चार्टर्ड अकाऊंटन्‍ट डे आहे त्‍यांनाही मोदीजींनी शुभेच्‍छा दिल्‍या. येत्‍या १५ ऑगस्‍ट पासून देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवाला सुरूवात होत आहे. ज्‍याला जसे जमेल तसे त्‍याने देशासाठी काम करावे अशी इच्‍छा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

या कार्यक्रमानंतर आ. मुनगंटीवार यांनी मा. मोदीजींनी अनेक विषयांना स्‍पर्श केल्‍याचे सांगत यापैकी जे जे शक्‍य आहे ते सर्व आम्‍ही करू, अशी ग्‍वाही दिली. या निमीत्‍याने देशाच्‍या लहान लहान गावातील लोकांनी केलेली मोठी कामे समोर आली व देशाची प्रतिभा कळली असे सांगीतले.

याप्रसंगी महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, महानगर सरचिटणीस राजेंद्र गांधी, उपमहापौर राहूल पावडे, पूर्व भाजपा शहराध्‍यक्ष तुषार सोम, भाजपा महानगर महिला आघाडीच्‍या अध्‍यक्षा अंजली घोटेकर, भाजपा महानगर युवा मोर्चा अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, प्रकाश धारणे, संजय कंचर्लावार, संगीता खांडेकर, आशा आबोजवार, छबू वैरागडे, खुशबु चौधरी, सचिन कोतपल्‍लीवार, सुरेश तालेवार, रेणु घोडेस्‍वार, मनिषा महातव, पंतजलीच्‍या श्‍वेता रेभनकर, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, यश बांगडे, कृष्‍णा चंदावार, राजेंद्र खांडेकर, हेमंत गुहे, बंडू गौरकार, महेश कोलावार, मधुकर राऊत, बाळू कोलनकर, पवन माहूरकर, प्रविण उरकुडे, सुभाष पडगेलवार यांची उपस्थिती होती.

*एसटी वर्कशॉप तुकूम येथे झालेल्‍या कार्यक्रमात* मोहम्‍मद जिलानी, सुभाष कासनगोट्टूवार, विठ्ठल डुकरे, रवि गुरनुले, माया उईके, पुष्‍पा उराडे, सोपान वाईकर, शीतल गुरनुले, अनिल फुलझेले, शिला चौहान, आशा देऊळकर, सुनिल डोंगरे, चंदन पाल, रूद्रा तिवारी, नामदेव काचाते, श्री. खोडे काका, उचलंचीवार काका, वनिता डुकरे, स्‍वप्‍नील डुकरे, विलास सोनटक्‍के यांची उपस्थिती होती.

*बंगाली कॅम्‍प येथे झालेल्‍या कार्यक्रमात* दिनकर सोमलकर, शशिकांत मस्‍के, धम्‍मप्रकाश भस्‍मे, मनोरंजन रॉय, सुरेश जांभुळकर, सुधाकर उलमाले, मनोज सिंघवी, हेमंत सिंघवी, यशवंत उराडे, सारिका उराडे, धनराज कोवे, रामजी हरणे, वंदना जांभुळकर, रोहीत विश्‍वास, आर. आर. भस्‍मे, मुन्‍ना भंडारी यांची उपस्थिती होती.

*जटपुरा गेट येथे झालेल्‍या कार्यक्रमात* रवि लोनकर, रवि आसवानी, सविता कांबळे, अॅड. राहूल घोटेकर, रितेश वर्मा, शितल आत्राम, वर्षा बोकडे, अमोल उत्‍तरवार, जगदीश वाळके, किशोर आत्राम, अंकुश भांदककर, सदानंद राजुरकर, रेंचु बावणे, अशोक मोगरे, किरण बुटले, ज्‍योती कवटेकर, स्‍वप्‍नील कांबळे यांची उपस्थिती होती.

*बाबुपेठ येथे झालेल्‍या कार्यक्रमात* प्रमोदभाऊ कडू, ब्रिजभूषण पाझारे, संदीप आगलावे, विजय मोगरे, दशरथ सोनकुसरे, दिवाकर पुध्‍दटवार, आकाश लक्‍काकुलवार, नगरसेवक कल्‍पना बगुलकर, प्रदिप किरमे, शाम कनकम, राजेश यादव, कुणाल गुंडावार, हिमांशू गादेवार, सागर भगत, सुरेश जमदाडे, रघु गुंडला, रविंद्र काळे, सचिन खेंगर, क्रिष्‍यन दुर्गम, शिवम कोडाम, बन्‍सी आयलरवार, दिनेश रोहिदास, उत्‍कर्ष नागोसे, सुनिता भोयर, कांता कोहपरे, अविनाश हिगाने यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *