माजी सरपंच लहु चहारे यांच्यावर जीवघेणा हल्ला.

By : Mohan Bharti

राजुरा  :– प्राप्त माहितीनुसार खामोना – माथरा गावचे माजी सरपंच लहू चाहरे यांना रामपूर- माथरा च्या जंगलात दोन तोंड झाकलेल्या इसमांनी सकाळी ६:३० च्या सुमारास त्यांची अडवणूक करून, गाडीवरून खाली पाडून त्यांचेवर जीवघेणा हल्ला केला. त्यात ते जबर जखमी झाले आहेत. चहारे हे राजुरा पासून ५ किमी अंतरावर असलेल्या माथरा गावी राहतात. त्यांचे तिथे किराणा व दूध विक्रीचे लहान दुकान आहे. दुकानासाठी ते दररोज पाकिटाचे दूध घेण्याकरिता राजुराला येत असतात. आज सकाळी नेहमी प्रमाणे दूध घेऊन दुचाकीवर जात असताना रामपूर माथरा च्या जंगलात दोन तोंड झाकलेल्या इसमांनी त्यांची अडवणूक करून, गाडीवरून खाली पाडत मोठा समाजसेवक बनत आहे, तक्रारी करून परेशान करत आहे म्हणत शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केले. समोरून दुसऱ्या गाड्या येत असतानाचे पाहत मारेकऱ्यांनी पळ काढला व तिथून पसार झाले. चहारे यांच्या पायाला जबर मार लागला असून मेडिकल करिता त्यांना चंद्रपूरच्या दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. पोलिसात झालेल्या घटनेची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. ग्रामस्थांच्या कोणत्याही समस्येच्या निराकरणा करिता नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या माजी सरपंच लहू चहारे यांना मारहाण का करण्यात आली हे मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतरच कळू शकणार आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *