आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुऱ्यात ५० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन.

By : mohan bharti

राजुरा :– आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा शहरात रस्ते विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. यात आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत बेघर कॉलनी, म्हाडा कॉलनी येथील खुल्या जागेवर सभागृह बांधकाम करणे- २० लक्ष, सोमनाथपूर गुंडावार जिनिंग जवळील खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे- २० लक्ष, सुतार समाज भवन व व्यापारी भवन इमारतीला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे – १० लक्ष रुपये अशा एकूण ५० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, विरोधी पक्ष नेता रमेश नळे, नगरसेवक हरजितसिंग संधू, गजानन भटारकर, नगरसेविका गीता रोहणे, संध्या चांदेकर, साधना भाके, उज्ज्वला जयपुरकर, मझिद कुरेशी, स नि यो अध्यक्ष साईनाथ बतकमवर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, महिपाल मडावी, अर्चना गर्गेलवार, योगिता मटाले, खाजा मोनिद्दिन, शाम बोलमवार, महादेव आत्राम, बंडू मानुसमारे, अविनाश निवलकर, सुभाष जानवे, बाळकृष्ण वांढरे यासह स्थानिक नागरिक उपस्थीत होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *