

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕सेवाकार्यासाठी आशाधाम ट्रस्टला केली ५० हजार रुपयांची वैयक्तिक मदत.
राजुरा :– विरुर स्टेशन येथील अशाधाम हॉस्पिटल मध्ये कोविड सेंटर चे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले. येथे १३ आॅक्सिजन बेड आणि १७ सर्वसाधारण बेड असे एकूण ३० बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. कोविड सेंटर सुरू करण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे पाठपुरावा केला त्याला यश येऊन येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले. येथील सेवाकार्याला प्रोत्साहन देत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्तीशः ५० हजार रू.ची मदत दिली आहे. तर काही दिवसापूर्वीच या सेंटरसाठी स्थानिक पोलीस आणि व्यापारी बांधवांनी सुध्दा आर्थिक मदत केली आहे. आशाधाम येथे कोविड सेंटर सुरु झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, तहसीलदार हरीष गाडे, गटविकास अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत, पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदा जेणेकर, सरपंच भाग्यश्री आत्राम, ग्रामसेवक नैताम, हवालदार प्रवीण कामडे, काँग्रेस नेते अजय रेड्डी, अक्केवरजी, इरफान सय्यद, सोनूसिंग टाक व गुरूद्वाराचे अध्यक्ष सरदार बवेजा, प्रवीण चिडे, सेवानिवृत्त शिक्षक पोवार, अशाधाम हॉस्पिटलचे डॉक्टर अलिजा बेद, प्रशासक व मेडिकल ऑफिसर आलिजा जोश यासह सर्व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.