केंद्र सरकारने दरवाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा. आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti

केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात राजुऱ्यात काँग्रेसचे आंदोलन.

राजुरा  :– केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत १०० रुपये लिटर चा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर आहे. भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅस सुद्धा ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच दोन वर्षांपासून सुरू असलेला कोरोना प्रादुर्भाव, लाकडाऊन यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली, अनेकांचे जीव गेले, संसार उघडय़ावर पडले, रोजगार – व्यापार बुडाले अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नागरिकांना इतर कोणतीही ठोस मदत तर केली नाही मात्र महागाईचा भडका उडवून जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे सरकारने ही अन्यायकारक दरवाढ मागे घेवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.
काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून आणि आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस च्या किमती मध्ये केलेल्या भरमसाठ दरवाढी विरोधात काँग्रेस जनसंपर्क कार्यालय जवळील देशपांडे पेट्रोल पंप येथे सकाळी ठिक ११ वाजता आंदोलन, नारेबाजी करून केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ नेते दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, राजुरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रंजन लांडे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवर,ओबीसी ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कार्या अध्यक्ष नंदकिशोर वाढई, जि प सदस्य मेघाताई नलगे, प स उपसभापती मंगेश गुरणुले , प.स. सदस्य कुंदाताई जेणेकर, न प सभापती हरजीत सिंग संधू, आनंद दासरी, महिला काँग्रेस शहराध्यक्ष तथा नगरसेविका संध्या चांदेकर, महिला काँग्रेस अध्यक्षा कविता उपरे, हरिचंद्र जुनघरी, शिवराम लांडे, सर्वानंद वाघमारे, अविनाश जेनेकर, संतोष इंदुरवार युवक शहर अध्यक्ष अशोक राव, रामभाऊ ढुमने, कवडू सातपुते, माजी नगरसेवक प्रभाकर येरने, पंढरी चंन्ने, विकास देवाडकर, इर्शाद शेख, धनराज चिंचोलकर, राजकुमार ठाकूर, शाहनवाज कुरेशी, माजी सभापती निर्मला कुडमेथे, सुमित्रा कुचनकर, अर्चना गर्गेलवार, शुभांगी खामनकर. नंदाताई गेडाम, पुनम गिरसावळे, मंगला हांडे, योगिता मटाले यासह राजुरा तालुका काँग्रेस कमेटी, सेवादल काँग्रेस, महिला कॉंग्रेस, अल्पसंख्याक विभाग, अनु.जाती जमाती विभाग, किसान काँग्रेस, तालुका युवक कॉंग्रेस, शहर काँग्रेस , शहर युवक कॉंग्रेस, एन.एस.यु.आय इत्यादी विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *