डॉ. पुरुषोत्तम गिरी यांचा अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज मंडळ सेलु यांच्या वतीने सत्कार

लोकदर्शन ÷वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी
⭕सेलु येथील रहिवासी डॉ.।पुरुषोत्तम गिरी यांची भारतीय रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध शास्त्र संघटनेच्या( IAPSM) महाराष्ट्र प्रदेश सचिवपदि निवड झाली आहे. बदनापूर जि.जालना येथे ( IIMSR) वैद्यकीय महाविद्यालयात कम्युनिटी मेडिशिन विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. पुरुषोत्तम गिरी यांनी आय.ए.पी.एस.एम.च्या नुकत्याच झालेल्या निवडणूकित त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ.विजय डोंपले यांच्यावर 535 पैकी 344 मते घेऊन मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांच्या या निवडिबदल सेलु येथील अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळाच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.यावेळी अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज मंडळाचे सेलु येथील अध्यक्ष मधुकर पुरी, उपाध्यक्ष बालासाहेब बन, सचिव रमेश गिरी, कोषाध्यक्ष अशोक गिरी, गोविंद गिरी, बाबु गिरी, पुरुषोत्तम गिरी, देवगिर गिरी आदिंची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *