आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पुन्‍हा 5 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध


लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर—————————-
*➡️चंद्रपूर जिल्‍हयासाठी व्‍हेंटीलेटरची संख्‍या वाढवावी – सुधीर मुनगंटीवार*

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी वित्‍तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर साठी 4 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर तर बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा या गावासाठी एक ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर देण्‍यात आले. दिनांक ११ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांना 4 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर सुपुर्द केले तर बल्‍लारपूर तालुका भाजपाचे सरचिटणी रमेश पिपरे यांना एक ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर सुपुर्द केले.

या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते ना. नितीन गडकरी यांच्‍या सहकार्याने 15 एनआयव्‍ही, दोन मिनी व्‍हेंटीलेटर आणि 15 मोठे व्‍हेंटीलेटर चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयासाठी उपलब्‍ध करून दिले आहे. त्‍याचप्रमाणे बल्‍लारपूरसाठी 10, मुलसाठी 6, पोंभुर्णासाठी 6 आणि चंद्रपूरसाठी 3 असे एकुण 25 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध करून दिले आहे. बल्‍लारपूर नजिक भिवकुंड विसापूर येथे आ. मुनगंटीवारांच्‍या पुढाकाराने 100 बेडेड कोविड केअर सेंटर सुरू करण्‍यात आले असुन आमदार निधीतुन 2 रूग्‍णवाहीका त्‍यांनी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे 100 पिपीई किटसुध्‍दा त्‍यांनी उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असुन तो रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने आपल्‍या परिने आपण पुर्ण प्रयत्‍न करित आहोत. जिल्‍हयात रूग्‍णसंख्‍येच्‍या प्रमाणात व्‍हेंटीलेटरची संख्‍या कमी आहे फक्‍त 84 व्‍हेंटीलेटर आजच्‍या तारखेला जिल्‍हयात उपलब्‍ध आहेत. जिल्‍हयात दररोज 1000 ते 1500 इतके रूग्‍ण आढळत आहेत. 1100 च्‍या वर मृत्‍यु झाले आहेत. व्‍हेंटीलेटर अभावी झालेल्‍या मृत्‍युची संख्‍या जास्‍त आहे. चंद्रपूर जिल्‍हयासाठी व्‍हेंटीलेटरची संख्‍या वाढविण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी बोलताना केली. बल्‍लारपूरसाठी 4 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल नगराध्‍यक्ष हरीश शर्मा यांनी आ. मुनगंटीवारांचे आभार व्‍यक्‍त केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *