महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाच्या शिवानी आडकीने व आरती थेरे ह्यांची आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड

0
136

 

दि 10/4/2021 मोहन भारती
– महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयातील बी, एस, सी ,अंतीम वर्षात शिकणाऱ्या शिवानी आडकीने आणि आरती थेरे ह्या दोघींची इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेकरीता भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे . ही स्पर्धा नेपाळ येथील पोखरा येथे होणार आहे
20 ते 23 मार्च दरम्यान कन्याकुमारी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या महिला गटात त्यांची निवड झाली होती.
या दोघीही खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आई ,वडील तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व प्रशिक्षक प्रा डॉ अनिस अहमद खान यांना दिले
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक कामगिरी बद्दल गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी विशेष अभिनंदन करीत दोघींना सन्मानित केले.तसेच प्रभारी सचिव धंनजय गोरे आणि व्यवस्थापन मंडळातील इतर सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कौतुक केले . विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पटले ,प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहेत
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here