आमदार सुभाष धोटे यांच्या पाठपुराव्याला यश : सिंधी – विरुर स्टेशन नाल्यावरील पुलाला मान्यता

By : Mohan Bharti

राजुरा :– सिंधी ग्रामपंचायतच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांच्याकडे राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी- विरुर स्टे नाल्यावरील पुलीया बांधकाम करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागाकडे या बाबतीत पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नाने सदर पुलाच्या अंदाजपत्रकाला तांत्रिक मान्यता देण्याकरिता प्रधान मंत्री ग्राम सळक योजनेची टिम प्रत्यक्षात येऊन पहानी केली. पुलाच्या उंची बद्ल ग्राम पंचायत च्या पदाधिकाऱ्यांना या टिमकडून विचारना करण्यात आली,तसेच अन्य आवश्यक बाबतीत चर्चा करण्यात आली. लवकरच तांत्रिक मान्यता देऊन पुढील कार्यवाही करु आणि या विषयावर चंद्रपुरात स्थानीक पदाधिकाऱ्यांसोबत दिनांक १८/०८/२०२१ला बैठक घेऊ असे अंसारी मॅडम EE नागपूर यांनी सांगितले.  या प्रसंगी वरलानी साहेब EE चंद्रपुर, जिवतोडे साहेब उप अभियंता, वडके साहेबJE चंद्रपुर, रामभाऊ ढुमणे उपसरपंच सिंधी, मंगेश रायपल्ले,राजु दामेरवार, विनोदराव ढुमणे,रज्जत डाहुले यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here