मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आभार* *गोंडवाना विद्यपीठ देणार PHD प्रवेश परीक्षा (PET) देण्याची संधी……**आवेदन पत्र स्विकारण्याची तारीख झाली २५ जुलै

0
105

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*👍भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरज पेदुलवार यांच्या प्रयत्नाला यश.*

गोंडवाना विद्यापीठाने नुकतेच PHD साठी आवश्यक असलेली प्रवेश परिक्षा (PET) जाहीर केली.त्यासाठी आवश्यक असलेल्या आवेदन पत्र भरण्याची तारीख 25 जुलै करण्यात आली आहे.भाजपा महानगर जिल्हा उपाध्यक्ष सूरज पेदूलवार यांनी हा विषय विधिमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ मुनगंटीवार यांच्या सुचने प्रमाणे विद्यपीठाकडे लावून धरला होता,हे विशेष.

पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी सदर परिक्षेला पात्र ठरतिल असे विद्यापिठाने नमुद केले होते. कोविडमुळे पदव्युत्तर परिक्षा 10 ॲागस्ट पासुन होणार आहेत. कोविड परिस्थिती नसती तर हि परिक्षा मार्च/एप्रिल महीण्यात झाली असती व संबधीत विद्यार्थी हे PET साठी पात्र ठरले असते.आता विद्यार्थ्यांना पुढील PET परीक्षेसाठी वर्षभर वाट पहावी लागली असती….
हा विषय आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष सुरज पेदुलवार यांनी मांडल्यानंतर यावर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कुलगूरूकडे पत्रव्यवहार करून चर्चा केली व सूचना केल्या.
विद्यापीठाने विषयाचे गांभीर्य ओळखून तशी अधीसुचना 20जुलैला काढण्यात आली आहे.यानिर्णयामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांनीं आनंद व्यक्त करीत आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here