ए
मुंबई प्रतिनिधि 👉 महेश कदम
कोराना च्या पार्श्वभूमीवर सर्वीकडे भितीचे वातावरण असताना सुद्धा घरा बाहेर पडता येत नाही म्हणुन घरीच राहुन मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग करायला सर्वांना आवडते पण हेच शॉपिंग लोकांना महागात सुद्धा पडले आहेत तर सावधान….
हल्ली कोरोना मुळे लोकं घरी बसले आहेत, नोकरी नाही, कसे बसे पैसे जमा करुन उदरनिर्वाह करत आहेत, त्यात ह्या आॅनलाईन चोरांचा सुळसुळाट आणि आपण ह्यात बळी पडतो. एखादी वस्तू घ्याची कि आपण बाजारात जाऊन पहातो आणि वस्तू विकत घेतो पण झटपट पाहिजे म्हणून आपण शाॅटकट मारतो आणि पश्चाताप करून डोक्याला हात लावून बसतो.
अशाच प्रकारे ऑनलाईन खरेदी लोकांना खुप महागात पडले आहेत, आमच्या माहिती नुसार इंडियन आर्मी च्या नावाने हल्ली लुबाडले जात आहे, फेसबुक वर ओ एल अॅक्स च्या नावाने डुबलीकेट फेक अॅकाऊंट बनवून वस्तू विकणयासाठी फोटो टाकतात व ती वस्तू आपण घेण्यासाठी काॅल करतो हे प्रकरण भरपूर होत आहेत, देशाच्या नावाने सामान्य लोकांना लुटायचे धंदे सुरू आहे, भारतीय सेना म्हणुन विश्वास केला जातो, एखादी वस्तू आपल्याला घ्याची आहे म्हणुन आपण त्या व्यकती ला काॅल करतो त्या वस्तूची माहिती घेतो आणि मग त्यांचा गोड गोड बोलुन खेळ सुरु होतो. जय हिंद साहेब- हम भारतीय सेना से है, आम्ही आता शिफ्ट होणार आहे, तुम्हाला वस्तू आवडली असेल तर तुमच्या घरी पाठवु आमचा व्यकती येऊन तुम्हाला देऊन जाईल, जर नाही आवडली कि पुन्हा घेऊन जाईल तर तुम्ही निश्चिंत रहा आणि आमच्यावर विश्वास ठेवा आमची माहिती चा पुरावा सुद्धा पाठवतो, तुम्ही तुमचा आधार कार्ड पाठवा आपण जी वस्तू घेतो त्या सामाना ची पॅकिंग करुन फोटो पाठवतात, मग ती वस्तू कोणती ही असो. हमारी डिलीव्हरी आयेगी, डिलीव्हरी चे पैसे पाठवा, आमच्या इंडियन आर्मीला ते दाखवले जातात, एकदा मार्किंग झाले कि तुम्हाला स्लिप देतो मग दुसर्या दिवशी डिलीव्हरी येईल त्याचा अगोदर पैसे आमच्या खात्यात जमा करा, जसे पैसे आले कि तुम्हाला तुमच्या अॅकाऊंट वर लगेच पैसे देऊ असे बोलुन मन जिंगतात व आपण पैसे विश्वासाने त्यांचा खात्यात जमा करतो, ते पैसे त्यांना भेटतात आणि मग सांगतात तुम्ही चुकीचा च्या पद्धतीने पैसे पाठवले आहेत, पुन्हा पैसे पाठवा, एकदा जमा झाले कि पुन्हा तुमच्या खात्यात जमा केले जाईल असे खोटे बोलुन डबल पैसे लुबाडायला बघतात, आपण जो आधार कार्ड त्यांना पाठवतो ते त्याचा गैर वापर करतात व आपल्याला डुबलीकेट फेक अॅकाऊंट, दोन नावे असलेले अॅकाऊंट, भारतीय सेनेची डुबलीकेट स्लिप, गुगल पे नंबर, इंडियन आर्मी चा कुणाचा तरी आयकार्ड फोटो व ईतर माहिती पाठवतात, आपल्याला ह्या सर्वांची कल्पनाच नसते. फक्त एक विश्वास इंडियन आर्मी च्या नावाने करतो आणि नाहक बळी पडतो, किती ही दया विनंती केली तरी त्यांना काही फरक पडत नाही हे लोकं कुठे असतात ह्याची खात्री सुद्धा नसते, भारतीय सेना च्या नांवाने फसवुन देशाची बदनामी करतात, आमच्या माहिती नुसार बरेच जणांचे ५००० पासुन ते जास्तीत जास्त पैसे लोकांचे फसवणूक द्वारे गेले आहेत आणि पैसे पुन्हा येण्याची अपेक्षा नसते, मात्र आपण काळजी घेतली पाहिजे म्हणुन बाहेर जाऊन खरेदी करा किंवा रेजिसेटर ऑनलाईन मधुनच खरेदी करा, बोगस आॅनलाईन शाॅपिंग द्वारा फसु नका.
या प्रकरणात मी स्थानिक पोलीस ठाण्यात, ऑनलाईन पोलिस तक्रार, सायबर गुन्हे शाखा मध्ये गुन्हा दाखल केला आहे त्याच प्रमाणे बॅंकेचे कागदपत्रे भरून अॅकाऊंट होल्ड करून पुढील तपास करण्यात सांगितले आहे, मी ह्या माध्यमातून त्यांची माहिती, फोन नंबर, अॅकाऊंट नंबर देत आहे, अजुनही हे लोकं फेसबुक व वाॅट्सअॅप वर आहेत, फेसबुक वर इंडियन आर्मी चा डी पी सुद्धा ठेवलेला आहेत, तुम्ही अधिक माहिती फेसबुक, गुगल, युटुयब वर घेऊन लोकांची फसवणूक थांबवु शकता. शोशल माध्यमातून कृपया हि बातमी शेर करावी व लोकांना जागृत करावे.
इंडियन आर्मी अधिकारी, भारत सरकार, सायबर गुन्हा शाखा, पोलिस अधिकारी ह्यांनी त्यांचे नंबर व लोकेशन ट्रेस करून माहिती घ्यावी व लवकरात लवकर तपास करून नाहक बळी पडणारे लोकांना सहकार्य करावे.