Nana Patole : शरद पवारांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंचं भाष्य, म्हणाले…

0
119

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज नाना पटोले यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. शरद पवारांशी काँग्रेस नेत्यांच्या भेटीसंदर्भात नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षाची स्टॅटर्जी आहे. त्यानुसार आमचे प्रभारी आणि नेते शरद पवारांना भेटायला गेले. ओबीसी आरक्षण जे भाजपनं संपवलं आहे. त्याविरोधात आम्ही एक आंदोलन उभं करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत भूमिका केंद्राकडून स्पष्ट झाली पाहीजे यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आमचे नेते शरद पवारांना भेटायला गेले होते, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, मला तिथं आमचे नेते गेलेले माहितीही नव्हतं. मला आमंत्रणही नव्हतं. माझा कुणावर व्यक्तिगत राग नाही. मला माझ्या पक्षाचं काम करायचं आहे. माझ्या पक्षाचं काम करताना कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही, असंही नाना पटोले म्हणाले.

◼️…म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत

नाना पटोले म्हणाले की, हायकमांडने मला पक्ष  मजबुत करण्याची जबाबदारी दिली ती मी पार पाडणार आहे. मी काही शिवसेना- राष्ट्रवादीविरोधात अॅटॅक करत नाही. भाजप विरोधात करतो. ते म्हणाले की, 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करतो आहोत. काँग्रेस मरणासन्न अवस्थेत आजीबातच नाही, संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते, असं नाना पटोले म्हणाले.

झोटिंग समितीच्या अहवालाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी बहुजन समाजाच्या नेत्यांचं खच्चीकरण केलं आहे. एकनाथ खडसेंचं याच कारणामुळे खच्चीकरण झालं आहे.  एखाद्या गोष्टीचा फार्स तयार करुन त्यात लोकांना गुंतवायचं हे फडणवीसांना जमतं. झोटींग समितीचा अहवाल देखील फार्सच आहे, असं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here