चंद्रपूर जिल्‍हयातील वनविभागाशी संबंधीत विविध समस्‍या तातडीने सोडविण्‍यासाठी बैठक – आ. सुधीर मुनगंटीवार

0
62

मा. प्रधान सचिव वने व संबंधित अधिका-यांशी झूम बैठकीचे आयोजन

चंद्रपूर जिल्‍हयातील वनविभागाशी संबंधीत विविध प्रश्‍न व रखडलेली कामे तातडीने सोडविण्‍यासाठी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍याचे प्रधान सचिव वने व संबंधित इतर अधिकार-यांची बैठक २५ जुन ला दुपारी १२ वाजता व्‍ही.सी. द्वारे  तातडीने बोलविली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये वनविभागाच्‍या अनेक योजना कार्यान्‍वीत केल्‍या. त्‍यातील अनेक योजना पुर्णत्‍वास आल्‍या व काहींची कामे सुरु होती. मात्र राज्‍यात महाविकास आघाडी सरकार आल्‍यानंतर अनेक प्रकल्‍पांना राशीच उपलब्‍ध न झाल्‍याने अनेक प्रकल्‍प रखडलेली आहेत. चंद्रपूर जिल्‍हयात वन्‍य प्राण्‍यांमुळे शेतपिकाच्‍या झालेल्‍या नुकसानाची भरपाई गेल्‍या सहा महिन्‍यांपासून संबंधित शेतक-यांना मिळालेली नाही. केलेले अर्ज व राशी देयके याची माहिती सुध्‍दा दिलेली नाही. चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावर विसापूर गावा नजिक बॉटनिकल गार्डनचे बांधकाम करण्‍यात येत आहे. जैवविविधतेचे संशोधन अभ्‍यास यासह पर्यटनाचे एक आकर्षक केंद्र निर्माण व्‍हावे असा या मागील मुळ उद्देश होता. मात्र गेल्‍या तीन वर्षापासून या गार्डनचे काम रखडलेले आहे. यासाठी आवश्‍यक निधी तात्‍काळ उपलब्‍ध करुन द्यावा. चंद्रपूर येथील वन अकादमी ही वन व्‍यवस्‍थापन, प्रशासन यांच्‍या प्रक्रियेतील देशातील अत्‍याधूनिक वन अकादमी आहे. एकुण वन विभागासाठी स्‍वप्‍नवत असलेल्‍या या वन अकादमीच्‍या  कामाचा आढावा देखील या बैठकीत घेण्‍यात येणार आहे. बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे गेली आठ ते दहा महिने काम बंद आहे. त्‍याचबरोबर ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाला आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्‍हणून लौकीक प्राप्‍त करण्‍यासाठी अनेक प्रयत्‍न केले. त्‍याचप्रमाणे अनेक प्रश्‍न अजुन शिल्‍लक आहेत. एकुणच चंद्रपूर जिल्‍हयातील वनविभागाशी संबंधीत अनेक प्रश्‍न मार्गी लावणे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीचे  तातडीने आयोजन केले आहे. त्‍यामुळे वनविभागाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here