बल्‍लारपूर तालुक्‍यातील आमडी येथे ग्रामपंचायत भवनासाठी २० लक्ष निधी मंजुर

0
46

लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
⭕*आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला शब्‍द केला पूर्ण*

विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर तालुक्‍यातील आमडी या गावात २० लक्ष रु. किंमतीचे ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम मंजुर केले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आमडी वासियांना ग्रामपंचायत भवनाबाबत दिलेला शब्‍द पुर्ण केला आहे.
ग्रामविकास विभागाच्‍या दि. ३१ मार्च २०२१ रोजीच्‍या शासन निर्णयानुसार आमडी येथील ग्रामपंचायत भवनाचे बांधकामासाठी २० लक्ष रु. निधी २५१५ या लेखाशिर्षा अंतर्गत मंजुर झाला आहे. या आधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आमडी या गावात विकासाची विविध कामे पुर्णत्‍वास आणली आहे. प्रामुख्‍याने स्‍मशानभुमी रस्‍त्‍याचे बांधकाम, राष्‍ट्रीय महामार्गाकडून गावाकडे येणा-या रस्‍त्‍याचे बांधकाम, गावाकडून बांबु डेपोकडे जाणा-या रस्‍त्‍याचे बांधकाम, गावातील अंतर्गत रस्‍त्‍याचे सिमेंटीकरण व नाली बांधकाम, पांदण रस्‍त्‍याचे बांधकाम, शाळेसाठी पेयजल व्‍यवस्‍था, २५१५ लेखाशिर्षा अंतर्गत सिमेंट रस्‍त्‍याचे बांधकाम, बोअरींग्‍ज अशी विकासकामांची मोठी मालिका आमडी या गावात तयार करण्‍यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्‍या भवनाच्‍या बांधकामाची नागरिकांची प्रलंबित मागणी त्‍यांच्‍या पुढाकाराने पुर्णत्‍वास येत असल्‍यामुळे भाजपा नेते अनिल मोरे, दिवाकर बोडे, प्रशांत मोरे, सुभाष तेलतुंबडे, बंडू गेडाम, बाबा वासाडे, सरपंच शिल्‍पा कुळसंगे, उपसरपंच धनराज चोथले, ग्रामपंचायत सदस्‍य सिमा उईके मंगला फुलझडे यांची आ. मुनगंटीवार यांचे आभार व अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here