करोनाविरोधातील लढ्यात सचिन तेंडुलकर मैदानात, ऑक्सिजनसाठी एक कोटी रुपयांची मदत

0
67

लोकदर्शन
करोना संकटाचा सामना करत असताना सध्या देशात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर करोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे.

सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही सचिनने अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली. तसेच, “मी खेळत असतााना तुमच्याकडून मिळालेला पाठिंबा अमूल्य होता, त्यामुळे मी यश मिळवू शकलो…आज आपण करोनाविरोधात लढणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभं राहण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची वेळ आहे”, अशा आशयाचा संदेशही यावेळी त्याने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here