शासकीय रुग्णालयांना रेमडेसिविर इंजेक्शन व औषधी पुरवठा त्वरित करावा

0
76

* आ सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दि 24/4/2021 लोकदर्शन


चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना (कोविड–१९) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने रोज २० ते ३० नागरीकांना आपला जिव गमवावा लागत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात नितान्त आवश्कता निमार्ण झालेली आहे. चंद्रपूर जिल्हयातील शासकिय रुग्णालयांस रेमडेसिविर मिळणे गरजेचे असताना खासगी रुग्णालयास अधिक पुरवठा होत असल्याने श्रीमंत लोकांनाच रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे तर शासकिय रूग्णालयातील गोरगरिब रुग्णांना वेळेवर रेमडेसिविर मिळत नसल्याने अनेकांना आपले जिव गमवावे लागत आहेत. यात गरिब व श्रीमंत अशा प्रकारचा भेदभाव होत असल्याचे सामान्य नागरिकांकडून मोठी खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणे विषयी ग्रामिण भागातील जनतेमध्ये तिव्र असंतोष निमार्ण झालेला आहे.
त्यामुळे वरील गंभीर बाब लक्षात घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन वाटपाबाबत कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने उपाय योजना करून जिल्हयातील शासकीय रुग्णालयांना प्राधान्याने रेमडिसीविर इंजेक्शन व औषधांचा पुरवठा करण्यात यावा जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ होईल व अनेकांचे जीव वाचतील. करीता आपल्या माध्यमातून याबाबतच्या सुचना स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात याव्यात अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेन्द्र सिंगने यांना निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here