विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या कोरपना कडून पीककर्ज वाटप

0
99

 

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने कोरोना काळातही शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य बी बियाणे खरेदी करण्याकरिता अडचण होऊ नये याकरिता शेतकऱ्यांची दखल घेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयरावजी बावने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कोरपना अध्यक्ष सुनील बावने यांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात बँकांकडून दिरंगाई न होऊ देता तालुक्यात सर्वात प्रथम आपल्या सोसायटी कडून शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळतील यासाठी कसोशीने प्रयत्न करून शेतकऱ्यांना 28907600 रुपये पीक कर्ज मंजूर करण्यात आले असल्याने 20 एप्रिल रोजी पीक कर्ज वाटप शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव जी बावणे संस्थेचे अध्यक्ष सुनील जी बावणे उपाध्यक्ष श्री मारुती रासेकर संस्थेचे संचालक मारुती पारखी चंद्रपूर जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक बुचुंडे साहेब बँकेचे निरीक्षक मालेकर साहेब संस्थेचे सचिव हेमंत जी लोडे शिपाई कवडू मडावी उपस्थित संस्थेमार्फत जिल्हा मध्यवर्ती शाखा कोरपना च्या वतीने संचालक मंडळाच्या प्रयत्नाने 219 सभासदांना पीक कर्ज मंजूर करून संस्थेचे सभासद देविदास डोगे प्रदीप मोहित्कर भारत गौरी दत्ता कोरवते पुंडलिक टोंगे आदी उपस्थित 28907600 कोटी पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे माहिती दिली
पीककर्ज वाटप करण्यासंदर्भात बँकांकडून दिरंगाई केली जात नाही. पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याचे असे मत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कोरपना अध्यक्ष सुनील भाऊ बावणे यांनी व्यक्त केलेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here