*भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण अंगीकारणे हिच त्‍यांना खरी आदरांजली – आ. सुधीर मुनगंटीवार

0
72

By : shivaji selokar
समता, स्‍वातंत्र्  आणि बंधुभाव ही मानवी मुल्‍ये स्विकारलेला स्‍वाभिमानी आधुनिक समाज भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण करावयाचा होता. बाबासाहेबांच्‍या शैक्षणिक व सामाजिक चळवळीचा हाच खरा मुलाधार होता. ज्ञानाअभावी व्‍यक्‍ती आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्‍यक्‍ती व समूहाला शिक्षण नाकारणे म्‍हणजे माणूस म्‍हणुन त्‍याचे अस्तित्‍व नाकारून त्‍याची क्षमता मारून टाकणे होय, अशी बाबासाहेबांची शिक्षण विषयक धारणा होती. विषमतामुक्‍त शिक्षीत समाज हे त्‍यांचे स्‍वप्‍न होते. त्‍यांची शिकवण अंगीकारणे हीच त्‍यांच्‍या जयंती दिनी त्‍यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

विश्‍वरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती दिनानिमीत्‍त भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण करून त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात आली. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बाबासाहेबांच्‍या प्रतिमेला माल्‍यार्पण केले. यावेळी महानगर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, स्‍थायी समिती सभापती रवी आसवाणी, प्रकाश धारणे, ब्रिजभुषण पाझारे, विशाल निंबाळकर, रविंद्र गुरनुले, सुभाष कासनगोट्टुवार, रामकुमार आकापेल्‍लीवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here