वाहनाचा शिकाऊ परवाना घरबसल्या मिळणार !

0
307

परिवहन विभागाकडून ‘एन.आय.सी.’ला दुरुस्तीची सूचना……….

( मोहन भारती *लोकदर्शन),

नागपूर : राज्याच्या परिवहन विभागाने  राष्ट्रीय माहिती केंद्र (एन.आय.सी.) ला  वाहनांशी संबंधित सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्तीची सूचना केली आहे.
जेणेकरून १ एप्रिलपासून इच्छुकांना आवश्यक प्रक्रिया करून घरबसल्या वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना देता येईल.
या उमेदवारांना परवान्यासाठी घरून ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे.
राज्यात १६ प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि ३४ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत.करोनामुळे या कार्यालयांत  कामावर मर्यादा आल्या आहेत.
त्याचा नागरिकांना फटका बसत आहे.त्यातच आर.टी.ओ. कार्यालयांत दलाल संस्कृतीही बोकाळल्याचा आरोप नेहमीच होत असतो.आर.टी.ओ. कार्यालयांची ही वाईट ओळख मिटवण्यासाठी परिवहन खात्याने हा निर्णय घेतला आहे.त्यासाठी एन.आय.सी.ला सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे.या प्रक्रियेनुसार उमेदवाराला प्रथम वाहन चालवण्याच्या परवान्यासाठी आर.टी.ओ.च्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून विशिष्ट तारीख घ्यावी लागेल.आधार कार्ड व इतरही माहिती अपलोड करून  शुल्क भरावे लागेल.त्यानंतर विशिष्ट तारखेला घरून ऑनलाईन परीक्षा देता येईल.त्यात उत्तीर्ण होणाऱ्यांना घरबसल्या वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना मिळेल.
लघु चित्रफितीद्वारे जनजागृती नवीन पद्धितीनुसार,सलग दोन दिवस प्रत्येकी ३० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्याचा विचार आहे.ही परीक्षा देताना अधूनमधून उमेदवारांच्या संकणक, लॅपटॉपवर रस्ते सुरक्षिततेबाबत नियमांची लघु चित्रफित व विविध नियम दृश्य स्वरूपात दिसतील.त्यातून जनजागृती करण्याचा परिवहन विभागाचा प्रयत्न आहे.
सध्या आर.टी.ओ. कार्यालयात एकाच वेळी परीक्षा घेतली जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here