बैलमपूर येथे जागतिक महिला दिन साजरा

0
379

गडचांदूर : -नेहरू युवा केंद्र, चंद्रपूर च्या वतीने बैलमपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विशाखा दुर्गे होत्या,
प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक पिंगे ,नेहरू युवा केंद्र च्या स्वयंसेविका सुप्रिया रत्नपारखी ,होत्या.याप्रसंगी महिलांनी आत्मनिर्भर बनून स्वावलंबी बनावे,महिलांनी स्वयंरोजगार करून आर्थिक विकास करावा असे आवाहन करण्यात आले,
कार्यक्रमात महिला बचत गट, ग्रामसंघ,महिला,मदतनीस, तथा गावकरी उपस्थित होते,
कार्यक्रमात चे संचालन व आभार प्रदर्शन नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेविका सुप्रिया रत्नपारखी यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here