By : Mohan Bharti
चंद्रपूर / गडचांदूर
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूरच्या प्राचार्य पदी डॉ. अनिल झोलबाजी चिताडे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार २ मे रोजी स्वीकारला आहे,
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे परीक्षा नियंत्रक, रजिस्ट्रार, आणि सध्या अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावर त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहेत ,कर्तव्यतत्पर, कार्यकुशल व्यक्तिमत्त्व अशी ओळख असलेले डॉ अनिल चिताडे यांची प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जाते आहे,
प्रा डॉ अनिल चिताडे यांनी राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे यापूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख पदी बरीच वर्ष कार्य केले आहे,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर चे सचिव या पदावर त्यांनी बरीच वर्ष कार्य केलेले आहेत व सध्या संचालक म्हणून कार्यरत आहे.





