स्थलांतरित मिरची तोड कामगारांच्या मुलांना लालगुडा शाळेने दिला प्रवेश

स्थलांतरित मिरची तोड कामगारांच्या मुलांना लालगुडा शाळेने दिला प्रवेश*

by : Ravikumar Bandiwae

नांदा फाटा : 

कोरपना तालुक्यातील लालगुडा गावाजवळ कामाला आलेल्या मिरची तोड स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षकाच्या प्रयत्नामुळे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले .
शिक्षण हक्क कायद्यानुसार समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘शाळाबाह्य विद्यार्थी मुक्त परिसर’ही मोहिम अधिक व्यापक व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा ता.कोरपना जि.चंद्रपूर येथील शिक्षक गोविंद पेदेवाड मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी विविध प्रयोग करत असतात. शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करून शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. यातून अनेक पालक व विद्यार्थी शाळाबाह्य मुलांची माहिती शिक्षकांना देतात.
दिवाळी नंतर जिल्ह्यातून हजारो कामगार मजुरी करण्यासाठी किंवा मिरची तोडण्यासाठी परगावी स्थलांतरित झाले आहेत. अशा कामगारांनी गाव सोडले तरी त्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट सुटू नये. यासाठी स्थलांतर झालेल्या मुलांना शिक्षण हमी कार्ड द्वारे राज्यातील कोणत्या ही शाळेत प्रवेश दिला जातो. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती ,कोरपना राजूरा तालुक्यामध्ये मजुरीसाठी दरवर्षी स्थलांतर होत असते. कामगारांसोबत त्यांची मुले ही बाहेरगावी निघून जातात त्यामुळे त्यांचे अर्धवट शिक्षण सुटते.
स्थलांतरित झालेल्या पालकांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.
शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे पंचायत समिती कोरपना चे गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी व गडचांदूर केंद्राचे केंद्रप्रमुख पंढरी मुसळे यांनी कौतुक केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here