गजाननराव गावंडे गुरुजी यांचे निधन

लोकदर्शन प्रतिनिधी

चंद्रपूर : चंद्रपूर शहर काँग्रेस माजी शहर अध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे माजी चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, माजी विभागीय कार्यवाह, माजी बोर्ड मेंबर तथा राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक श्री गजाननराव गावंडे गुरुजी यांचे आज, दिनांक ०९ जानेवारी २०२४ रोजी दुःखद निधन झाले. या घटनेने शिक्षण क्षेत्रासह काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

गजाननराव गुरुजी हे शिक्षण क्षेत्रात एक आदर्श शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली. ते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अनेक वर्षे निष्ठापूर्वक काम करत होते. त्यांनी संघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, विभागीय कार्यवाह आणि बोर्ड मेंबर म्हणून काम पाहिले. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

गजाननराव गावंडे गुरुजी हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. काँग्रेस पक्षाला संघटित आणि मजबूत करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले.

गजाननराव गावंडे गुरुजी यांचे निधन हे शिक्षण क्षेत्रासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी एक मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर आणि त्यांच्या चाहत्यांवर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी ईश्वरचरणी केली आहे. 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here