Home
Home Breaking News अस्ते-डू मर्दानी आखाड्यातील ABPS विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील निवड*

अस्ते-डू मर्दानी आखाड्यातील ABPS विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील निवड*

 

लोकदर्शn गडचांदूर…👉 मोहन भारती

आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी अस्ते-डू मर्दानी आखाडा (मार्शल आर्ट) राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन संस्थेचा गौरव केला.
नुकतेच अमरावती येथे झालेल्या अस्ते-डू मर्दानी आखाड्याच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यात आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली.  यामध्ये प्रत्युष सिंह ने पदसंचालन मध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक, लिशन भांगे ने द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक आणि स्वरा पडगीलवार ने शिवकला मध्ये तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावले.
शाळेच्या क्रीडा शिक्षिका सौ.सिंधू कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.  शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना गोळचा, शाळा व्यवस्थापनाचे सदस्य व शाळेतील शिक्षकांनी या अप्रतिम कामगिरीबद्दल विजेत्यांचे अभिनंदन केले व आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here