Home
Home Breaking News सरदार पटेल अभ्यासिकेकडून निखिल गौरकार चा सत्कार. ♦️निखिल महाट्रान्सको परीक्षेत राज्यातून...

सरदार पटेल अभ्यासिकेकडून निखिल गौरकार चा सत्कार. ♦️निखिल महाट्रान्सको परीक्षेत राज्यातून अव्वल.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– सरदार वल्भभाई पटेल अभ्यासिका नगर परिषद राजुरा येथे महाट्रान्सको परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या व सहायक अभियंता पदी निवड झालेल्या याच अभ्यासिकेचा गुणवंत विद्यार्थी निखिल मारोती गौरकार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष न. प. राजुराचे कर निर्धारण अधिकारी अक्षय सुर्यवंशी होते. प्रमुख मार्गदर्शक नवनियुक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहल शेलार, कक्ष अधिकारी गौरी पाटील, कक्ष अधिकारी पुनम अहिरे, लेखाधिकारी अश्विनकुमार भोई, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अभ्यासिकेचे ग्रंथपाल प्रविण बुक्कावार तसेच अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी सत्कारमूर्ती निखिल गौरकार यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगितला तर उपस्थित सर्व मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेवून त्याचे निराकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी ताजणे यांनी तर आभार प्रदर्शन रजनी पिदुरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभ्यासिकेतील विद्यार्थी चेतन लांडे, अक्षय आत्राम, आदर्श डंभारे, आशिष मोहुर्ले, सुरज आस्वले, सुयोग झाडे इतरांचा हातभार लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here