गुरूच्या सानिध्यात राहून आत्मोन्नती साधावी : माजी आमदार ॲड.संजय धोटे

by : Satish Musle
कोरपना :
आयुष्य हे आपणास निर्मात्याने दिलेले अनमोल रत्न आहे. जीवनामध्ये ध्यानमार्गाचा ध्यास असल्यास भगवंताची प्रचिती नक्की येईल. म्हणून गुरूच्या सांनिध्यात राहून आत्मोन्नती साधावी असे आवाहन माजी आमदार ऍड. संजय धोटे यांनी केले.
संत फुलाजी बाबा वार्षिक उत्सव समिती लोणी यांच्या वार्षिक महोत्सवादरम्यान ते बोलत होते.मी जीवनात ध्यानमार्गानी बऱ्याच प्रचिती अनुभवलेल्या. आपणसुद्धा हा मार्ग पत्करावा असेही त्यांनी सांगितले.
या वार्षिक महोत्सवात तेलंगणा आणि विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर जिल्ह्यातील साधक बांधव, मातृशक्ती उपस्थित होती. ह.भ.प. डाखरे महाराज, किन्नाके महाराज,तुकाराम दादा राठोड, पोद्देवार गुरूजी,कोहपरे महाराज यांनी उपस्थित भक्तगणांना संबोधित केले.
यावेळी उद्योजक नीलेश ताजणे,लोणी संस्थान अध्यक्ष गजानन वडस्कर,मारोती मुसळे, बंडु थेरे, सुभाष वडस्कर, उपसरपंच अविनाश वाभिटकर,पोलिस पाटिल एकनाथ वडस्कर, संजय पिंपळशेंडे,वासुदेव आवारी,तुकाराम कोकणारे महाराज,ज्योतिराम लेनगुरे,बंडु नागोसे,देविदास काकडे, बंडु चौधरी यांच्या सह पंचक्रोशीतील हजारो साधक बांधव उपस्थित होते.
सतिश मुसळे यांनी एकात्मता आणि वेदमंत्र पठण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.सोबतच ध्यानधारणा कार्यक्रम मुर्लिधर नागोसे यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम नांदेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष वडस्कर यांनी केले.
#lonisatishmusle

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *