शरदराव पवार महाविद्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर:-
शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने *रंगतरंग 2023* या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यात वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर, रांगोळी, मेहंदी, समूहगीत गायन, फॅशन शो व नृत्यस्पर्धा घेण्यात आल्या. लोकशाही सक्षमीकरणासाठी युवकांची भूमिका या विषयावर वक्तृत्व स्पर्धा दि. 20 जानेवारीला आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण 19 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात प्रथम क्रमांक कोमल वडीकर, द्वितीय क्रमांक दिशा वाघमारे आणि तृतीय क्रमांक आकाश यांनी घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. आकनूरवार सर यांनी केले. महाराष्ट्रातील महिलांचे सामाजिक व राजकीय कार्य या विषयावर दि. 21 जानेवारी ला पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्रथम क्रमांक तेजस्विनी झाडे, द्वितीय क्रमांक आचल ढेंगळे,आणि तृतीय क्रमांक निकिता पाटील यांना मिळाला या स्पर्धेचे परीक्षण प्रा. कर्णवार सर आणि प्राध्यापक मुपीडवार सर यांनी केले होते. पर्यावरण बचाव या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली त्यात एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रथम क्रमांक माधुरी बोबडे,द्वितीय क्रमांक निकिता पाटील आणि तृतीय क्रमांक प्रतीक्षा चौधरी या विद्यार्थ्यांना मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण कु. वैशाली हरखंडे मॅडम आणि राय मॅडम यांनी केली मेंहदी स्पर्धेत एकूण 21 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांक आचल ढेंगळे, द्वितीय क्रमांक सिमरन शेख आणि तृतीय क्रमांक निकिता पाटील यांना मिळाला. देशभक्तीपर गीत स्पर्धा आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन या विषयावर दिनांक 24 जानेवारीला ही स्पर्धा घेण्यात आली. या दोन्ही स्पर्धेचे परीक्षण डॉ. सुनील बिडवाईक आणि प्रा. उज्वला जानवे मॅडम यांनी केले. यात प्रथम क्रमांक रोहिणी ग्रुपला मिळाला तर द्वितीय क्रमांक दिशा ग्रुपला आणि तृतीय क्रमांक दुर्गा ग्रुपला मिळाला. लोकनृत्य स्पर्धा दिनांक 25 जानेवारीला घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण 108 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत एकूण 18 ग्रुप सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अंजली वासेकर ग्रुपला मिळाला द्वितीय क्रमांक दुर्गा ग्रुपचा आला आणि तृतीय क्रमांक सनम पाचभाई ग्रुपला मिळाला. कु. गौरी नामेवार मॅडम आणि इगरपवार सर यांनी केले. या कार्यक्रम आयोजन प्राचार्य संजय कुमार सिंग, शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.आकनूवार सर होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माया मसराम सांस्कृतिक विभाग प्रमुख, शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर यांनी केले तसेच सूत्रसंचालन दिशा जुनघरी आणि दीक्षा वाघमारे यांनी केले या कार्यक्रमासाठी डॉ. हेमचंद्र दुधगवळी डॉ.सुनील बिडवाई ,डॉ.संजय गोरे, डॉ. राजेश गायधनी, डॉ. शरद बेलोरकर, डॉ.सत्येंद्र सिंग, प्रा. मंगेश करंबे प्रा. उज्वला जानवे , श्री. शशांक नामेवार, विनोद उरकुडे, सुभाष टेकाम, धर्मराज पोहाणे,सुरेश चांदेकर, रमेश भोयर, तानाजी बुरान, या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *