Home
Home Breaking News ज्ञानदिप प्राथमिक विद्यालयात जयंती साजरी

ज्ञानदिप प्राथमिक विद्यालयात जयंती साजरी

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदिप प्राथमिक विद्यालयात राष्ट्रमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.एम. कावळे, व्हि.एन.बोंडे, बि.बि.मोरे, सौ,जि.आर. मळी, सौ.जे.बि.शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाबाई व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची भाषणे झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जि.एम.कावळे, व्हि.एन.बोंडे, बि.बि.मोरे, जि.आर.मळी, जे.बि.शिंदे आदिंनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या जिवनचारीत्र्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक प्रविण क्षीरसागर यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here