युगाज्ञा रामटेके ची रोलर स्केटिंग शालेय स्पर्धेत राज्य स्तरावर निवड

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा आयोजित विभागीय स्तरावरील रोलर स्केटिंग स्पर्धेत कार्मेल अकॅडमी, दाताळा रोड,चंद्रपूर येथील 5 व्या वर्गात शिकणारी कु युगाज्ञा चरणदास रामटेके हिने द्वितीय क्रमांक पटकावला व सिल्व्हर पदक मिळविले आहेत, तिची आता राज्य स्तरावर निवड झाली असून नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे,
नागपुरात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अभय महल्ले यांच्या हस्ते झाले .
युगाज्ञा ची राज्य स्तरावर निवड झाल्याबद्दल कार्मेल अकॅडमी च्या प्राचार्या कविता नायर,सेबास्टीयन वायालील,क्रीडा शिक्षक राकेश सर,व इतरांनी कौतुक केले आहे,
युगाज्ञा ला क्रीडा प्रशिक्षक आतिष धुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले,
संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय, पेल्लोरा येथील एम सी व्ही सी विभागाचे प्रा डॉ चरणदास रामटेके यांची ती मुलगी आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here