आमदार सुभाष धोटे यांनी घेतले कोरपना येथील देवींचे दर्शन.

लोकदर्शन👉 मोहन भारती

कोरपना :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी कोरपना येथील शारदा मंडळांना भेट देऊन देवींचे दर्शन घेतले. कोरपना च्या नगराध्यक्षा सौ. नंदाताई बावणे आणि रूक्मिनी शारदा महिला मंडल यांच्या आग्रहास्तव शारदा देवीच्या आरतीत सहभाग घेतला. जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे, उपनगराध्यक्ष इस्माईल भाई, नगरसेवक नितीन बावणे, मनोहर चन्ने, निसारभाई शेख, लक्ष्मण पंदरे, नगरसेविका मनीषा लोडे, कृ उ बा समिती कोरपना संचालक गणेश गोडे, रमजान गादिवाले, प्रशांत लोडे, गणेश भोयर, ज्ञानेश्वर भुसारी, पुडलिक गिरसावळे, रुक्मिणी शारदा महिला मंडळ उज्वला धारणकर, प्रभाताई गिरडकर, विमलबाई सोनू वरारकर, वंदना वारभे, माधुरी टेकाम, महिला भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here