राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेत विलीन करण्यासाठी लवकरच श्री. उध्दव ठाकरे यांची भेट घेणार. – विष्णु कारमपुरी (महाराज)

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २६/०८/२०२२ :-* महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेसोबत काम करण्याच्या तयारी दर्शविले असून याबाबत शिवसेनेत संलग्न होण्यासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती कामगार नेते विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे पदाधिकारी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्यासह शिवसेना नेते, शिवसेना प्रवक्ते व खासदार श्री. अरविंद सावंत साहेब यांची मुंबई येथील कामगार सेना भवनात भेट घेऊन राष्ट्रीय विणकर सेवा संघाचे पदाधिकारी शिवसेनोच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी श्री. अरविंद सावंत साहेब यांनी सदर बाबत मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मातोश्री बंगल्यात रक्षाबंधन कार्यक्रमावेळी कारमपुरी (महाराज) यांनी राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेसोबत काम करण्यास तयारी दर्शविली असल्याची माहिती श्री. उध्दव ठाकरे साहेबांना दिली. त्यावेळी मा. उध्दवजी ठाकरे साहेबांनी सदर विषयांस अनुमती देऊन लवकरच भेटीची वेळ कळविण्यात येईल. असे सांगितले. त्याआधारे राष्ट्रीय विणकर संघ शिवसेनेत संचलित करण्यासाठी लवकरच उध्दवजी ठाकरे साहेबांना भेटणार असल्याचे कारमपुरी (महाराज) यांनी या पत्रकात नमूद केले आहे. *●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- महाराष्ट्र राष्ट्रीय विणकर सेवा संघ शिवसेनेत विलीन करण्याबाबत मा. उध्दवजी ठाकरे साहेबांची चर्चा करतांना विष्णु कारमपुरी (महाराज), विठ्ठल कुऱ्हाडकर, रविंद्र मात्र्हे, श्रीधर आडकी, रेखा आडकी आदि दिसत आहेते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here