बॅडमिंटन स्पर्धेत सुदिप पाटील, शैलेश सिंग यांनी प्रथम क्रमांक तर विजय भोईर, वैभव करकमकर यांनी पटकविला तृतीय क्रमांक

लोकदर्शन👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि. 21 ऑगस्ट नवी मुंबई स्पोर्ट कॉप्लेक्स वाशी येथे नवी मुंबई बॅडमिंटन स्पर्धा 2022 चे आयोजन महाराष्ट्र बॅडमिटंन असोशिएशन तर्फे करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्‌घाटन नवी मुंबईचे शिल्पकार तथा भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. सदर बॅड‌मिटन स्पर्धेचे हे 3 रे वर्ष आहे. एकूण 24 संघाचा तर 300 स्पर्धक उमेदवार या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुदिप काशिनाथ पाटील (जसखार- उरण), शैलेश राकेश सिंग (जेएनपीटी-उरण )यांनी प्रथम क्रमांक पटकविला तर विजय राजाराम भोईर (नवघर- उरण), वैभव करकमकर (कल्याण )यांनी तृतीय क्रमांक पटकाविला .सुदीप पाटील, शैलेश सिंग यांचा सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात आला.सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष बाळकृष्णन आणि महाराष्ट्र बॅडमिटन असोशिएनच्या पदाधिकारी सदस्यांनी मेहनत घेतली. सुदीप पाटील, शैलेश सिंग, विजय भोईर, वैभव करकमकर यांनी या बॅडमिंटन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here